- तर दीड हजारावर गावात होऊ शकते शाळा सुरू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:10 AM2021-07-11T04:10:30+5:302021-07-11T04:10:30+5:30
ग्रामपंचायतींचा ठराव अनिवार्य : आठवी ते बारावीचे भरणार वर्ग, कोरोनामुक्त गावांना प्राधान्य अमरावती : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षांपासून शाळा ...
ग्रामपंचायतींचा ठराव अनिवार्य : आठवी ते बारावीचे भरणार वर्ग, कोरोनामुक्त गावांना प्राधान्य
अमरावती : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षांपासून शाळा महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याकरिता ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. यंदा नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असली तरी अद्याप विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावलेली नाही. त्यामुळे ऑनलाईनवर शाळांचा डोलारा सुरू आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग आता आटोक्यात आल्यामुळे काही दिवसात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होऊ शकतात. यासाठी कोरोनामुक्त गावांना प्राधान्य राहील.
शाळा सुरू करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींचा ठराव व गावस्तरावर गठित केलेल्या समितीची मंजुरी तसेच पालकांची सहमती मिळाल्यावर शाळा सुरू केली जाणार आहे. यासाठी गावस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. ग्रामसेवक हे समितीचे सदस्य सचिव आहेत. याशिवाय शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, तालुका आरोग्य अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांचा समावेश आहे. या समितीच्या माध्यमातून गावस्तरावर निर्णय घेऊन तसा प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू केले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून तयारी सुरू आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील एकूण शाळा -२८८५
जिल्हा परिषद शाळा -१५८३
अनुदानित -७३८
कायम विनाअनुदानित शाळा -३७१
जिल्ह्यातील एकूण गावे -१६८७
कोरोना मुक्त असलेली गावे -१५३६
बॉक्स
१५३६ शाळा आहेत सज्ज
नवीन शैक्षणिक सत्राला २८ जून पासून सुरुवात झाली. त्याच धर्तीवर सर्व शाळा सुरू करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
इयत्ता आठवी ते बारावी पर्यतचे वर्ग सुरू शासनाच्या निर्णयानुसार दिड हजारावर शाळा सज्ज आहेत.
शालेय परिसर वर्गखोल्यांची साफसफाई आणि रंगरंगोटी सुद्धा करून ठेवण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना सुद्धा करण्यात सूचना दिल्या आहेत.
बॉक्स
आतापर्यंत एकाही ग्रामपंचायतीचा ठराव नाही
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. विविध तालुक्यातील अनेक गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यानुसार गत दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने पालकांची सुद्धा चिंता वाढली आहे. त्यामुळे आता कोरोना मुक्त गावे झाल्यामुळे शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील आजघडीला एकाही ग्रामपंचायतीने शाळा सुरू करणेबाबतचा ठराव शिक्षण विभागाकडे सादर केलेला नाही.
बॉक्स
कोट
मुलांचे शैक्षणिक नुकसान पाहता शाळा सुरू करणे गरजेचे आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. परंतु, मुलांच्या सुरक्षेबाबतही आवश्यक ती दक्षता घेणे तितकेच गरजेचे आहे.
- आशिष गावंडे, पालक
कोट
जिल्ह्यात आता कोरोचा संसर्ग आटोक्यात आला आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून आणि योग्य काळजी घेऊन शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही. मुले घरच्या घरी राहून त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शाळा सुरू झाल्यास पाल्यांना शाळेत पाठवा.
- हर्षिता कावरे,
पालक
कोट
शासनाने आठवी ते बारावीचे वर्ग ऑफलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ग्रामपंचायत ठराव आणि पालकांची एनओसी आवश्यक आहे. यासाठी एक समितीदेखील तयार करण्यात आली आहे. समितीच्या माध्यमातून ठराव प्राप्त झाल्यानंतर शाळा सुरू करण्यात येतील. सोबत शिक्षकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शंभर टक्के होणे आवश्यक आहे.
- एजाज खान, शिक्षणाधिकारी प्राथमिक
बॉक्स
तालुकानिहाय कोरोनामुक्त गावांची संख्या
अमरावती - १२९
भातकुली - १२३
मोर्शी - १०१
वरूड - १०६
अंजनगाव सुर्जी - ८५
अचलपूर - ९४
चांदूर रेल्वे - ७९
चांदूर बाजार - १२७
चिखलदरा - १६५
धारणी - १५३
दयार्पूर - १०५
धामणगाव रेल्वे - ८२
तिवसा - ६६
नांदगाव खंडेश्वर - १२१