समाज मंदिराच्या जागेचा वाद

By admin | Published: September 8, 2015 12:10 AM2015-09-08T00:10:52+5:302015-09-08T00:10:52+5:30

लहान मुुलांच्या खेळण्याच्या नझूलच्या खुल्या जागेवर नगरपरिषदेने समाज भवन बांधण्याचा घाट घातला आहे.

Society disputes the space of the temple | समाज मंदिराच्या जागेचा वाद

समाज मंदिराच्या जागेचा वाद

Next

बांधकामाला विरोध : नगरपालिकेने केले कामाचे भूमिपूजन
अचलपूर : लहान मुुलांच्या खेळण्याच्या नझूलच्या खुल्या जागेवर नगरपरिषदेने समाज भवन बांधण्याचा घाट घातला आहे. भविष्यात लहान मुलांना खेळण्यासाठी जागा तर राहणार नाही, शिवाय लोकांचा येण्या-जाण्याचा रस्ता होण्याची शक्यता असल्याने तेथील रहिवाशांनी या समाज भवनाच्या बांधकामाला विरोध केला आहे. त्या विरोधाला न जुमानता नगरपरिषदेने तेथे भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतल्याने रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
येथील सुलतानपुऱ्याला लागून असलेल्या फैजपुरा येथे नझूल प्लॉटचे बाजूला शिट नं. २७ बी प्लॉट नंबर ८४ ही जागा गेल्या तीस वर्षांपासून रिकामी पडली आहे. तेथे लहान मुले खेळ खेळतात. गोरगरिबांच्या मुलांचे लग्न येथेच होतात. तसेच एखादा कार्यक्रमही येथेच घेतात.
या जागेवर समाज भवन झाल्यास लहान मुलांचे खेळाचा प्रश्न निर्माण होईल. गोरगरिबांना दूरवरच्या जागेत किंवा मंगल कार्यालयात जाऊन लग्नकार्य उरकावे लागेल तसेच येथूनच पक्का रस्ता असल्याने लोकांच्या येण्या-जाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
तो रस्ता पूर्णत: बंद होण्याची शक्यता आहे. या समाज भवनासाठी ही दुसरी जागा निवडली व त्यासाठी तेथे समाज भवनाचे बांधकाम करण्यात येऊ नये, अशी मागणी फैजपुऱ्यातील रहिवाशांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे मागील महिन्यात केली होती.
त्यावर मिलिंद मोहोड, रमेश दामले, सुभाष इंगळे, रुपराव धाकडे, गजानन वाडेकर, वनिता घटाळे, अनिल श्रीराव, पुष्पा गाडबैल, आशीष कस्तुरे, विनायक नंदनवार, रवींद्र जांबे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या. (शहर प्रतिनिधी

विरोध झुगारून भूमिपूजन
या विरोधाला न जुमानता १९ जुलै २०१५ रोजी या खुल्या प्लॉटवर नगरसेवक अरूण वानखडे (माजी नगराध्यक्ष) यांच्या हस्ते समाज भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी श्रीकांत झोडपे, राजुसिंह बघिले यांचेसह आदी उपस्थित होते व बांधकामासाठी तत्काळ खड्डे खोदले. त्यामुळे रमेश घटाळे, वनिता घटाळे, रामदास श्रीराव, कैलास सिरसुद्धे, चिन्मय घटाळे, अंजू वाकोडे, शीला वाकोडे, प्रफुल्ल महाजन आदींनी पुन्हा लेखी तक्रारी अर्ज देऊन कामबंदची मागणी केली.

तेथील रहिवाशांचा विरोध असेल तर हे काम दुसऱ्या जागेत करू. त्यांनी जागा दाखवावी, ती जागा गेल्या कित्येक वर्षांपासून रिकामी पडली आहे. तिथे इतर कुणी अतिक्रमण करू नये म्हणून या जागेत समाज मंदिर बांधणे काय चुकीचे आहे. या जागेचे मी मागील महिन्यात भूमिपूजन केले आहे. हे समाज मंदिर फैजपुऱ्यातच होईल. ज्या भागात घरकूल दिले आहेत त्या भागाच्या विकासासाठीच ही शासनाची योजना आहे.
- अरूण वानखडे, माजी नगराध्यक्ष.

तेथील रहिवाशांचा विरोधाचा विचार करू त्यांनी चांगली जागा दाखवावी, त्यांचे व बांधकाम विभागाचे मत घेऊन ठरवू. प्रत्येक भागात दोन गट असतात. बहुमताचा विचार करू. अरुण वानखडे यांनी भूमिपूजन कधी केले याची आपणास माहिती नव्हती. पण जेव्हा भूमिपूजन केल्याचे समजले. पण तेव्हा बांधकाम संदर्भात तांत्रिक बाबी पूर्ण झालेल्या नव्हत्या.
- रंगलाल नंदवंशी, नगराध्यक्ष.

Web Title: Society disputes the space of the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.