मेळघाटात सौरऊर्जा उपसा सिंचन प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 11:20 PM2018-05-04T23:20:21+5:302018-05-04T23:20:21+5:30
मेळघाटातील दिया या गावात सौरऊर्जेवरील उपसा सिंचन प्रकल्पातून यशस्वीरीत्या संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मेळघाटातील आणखीन पाच गावांना सौरऊर्जेवरील उपसा सिंचन प्रकल्प योजना राबविण्यास जिल्हाधिकारी यांनी मान्यता देण्यात दिली आहे. या प्रकल्पांवर १ कोटी ४० लक्ष ८४ हजार रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: मेळघाटातील दिया या गावात सौरऊर्जेवरील उपसा सिंचन प्रकल्पातून यशस्वीरीत्या संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मेळघाटातील आणखीन पाच गावांना सौरऊर्जेवरील उपसा सिंचन प्रकल्प योजना राबविण्यास जिल्हाधिकारी यांनी मान्यता देण्यात दिली आहे. या प्रकल्पांवर १ कोटी ४० लक्ष ८४ हजार रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
मेळघाटातील कठाव २९.३२ लाख, उतावळी २७.३५ लाख, गौलखेडा, २८.०४ लाख, गोंडवाडी २६.९३ लाख व सोनाबर्डी २९.२० लाख एवढा निधी या प्रकल्पांवर खर्च होणार आहे. सौरऊर्जा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून ज्या गावात पाण्याचा स्रोत आहेत. थेतील पाणी अडवून सौरऊर्जेचा उपयोग करून कृषिपंपाच्या उपयोग करून ते पाणी टेकडीवरील शेततळ्यात सोडण्याची योजना यापूर्वी राबविण्यात आली होती. या प्रकल्पांमध्ये थोडी सुधारणा करण्यात आली असून, ते पाणी टेकडीवर काँक्रीटची टाकी तयार करून त्यामध्ये सोडण्यात येणार आहे. या पाण्याची या ठिकाणी साठवणूक करून, ते पुन्हा गुरुत्वबलाने पाइप लाइनने आदिवासी बांधवांच्या शेतीपर्यंत पोहचविल्या जाणार आहे.
दिया गावांचा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आणखीन पाच गावांना निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे आदिवासी बांधवांना उत्तम शेती करता येणार आहे.
- क्षीरसागर,
कार्यकारी अभियंता