मेळघाटात उपसा सिंचन योजनेला सौर ऊर्जेचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:21 PM2017-11-30T23:21:32+5:302017-11-30T23:21:43+5:30

धारणी तालुक्यातील आदिवासीबहुल भागात नदी व बंधाऱ्यातून सोलर पंपाच्या माध्यमातून पाण्याचा उपसा करून ते पाणी उंच शेततळ्यात साठविण्यात येणार आहे. त्याचा आदिवासी शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ होण्याच्यादृष्टीने हा प्रकल्प जलसंपदा विभागाच्यावतीने राबविण्यात येणार आहे.

 Solar Power Power to Lift Irrigation Scheme in Melghat | मेळघाटात उपसा सिंचन योजनेला सौर ऊर्जेचे बळ

मेळघाटात उपसा सिंचन योजनेला सौर ऊर्जेचे बळ

Next
ठळक मुद्देराज्यात ठरणार मॉडेल : २५ हेक्टर शेती येणार सिंचनाखाली

संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : धारणी तालुक्यातील आदिवासीबहुल भागात नदी व बंधाऱ्यातून सोलर पंपाच्या माध्यमातून पाण्याचा उपसा करून ते पाणी उंच शेततळ्यात साठविण्यात येणार आहे. त्याचा आदिवासी शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ होण्याच्यादृष्टीने हा प्रकल्प जलसंपदा विभागाच्यावतीने राबविण्यात येणार आहे. मेळघाटात राबविला जाणारा हा राज्यातील पहिलाच प्रयोग असावा. तो यशस्वी झाल्यास हा प्रकल्प राज्यभर राबविण्यात येणार आहे. तो मॉडेल म्हणून राबविला जाणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश ढवळे यांनी दिली.
दिया गावात राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी शासनाने २१.९३ लाख रूपये मंजूर केले आहे. यातून आदिवासी बांधवांच्या २५ हेक्टरपर्यंत शेतीला यातून संरक्षित सिंचन मिळणार आहे. सदर योजनेचा लाभ हा दारिद्ररेषखालील येणाऱ्या कुटुंबास मिळणार आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध झाल्यानंतर शेतकºयांना ३ पिके घेण्याची संधी मिळणार आहे. मेळघाटातील आदिवासी शेतकºयांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने ही योजना मंजूर केली आहे. अमरावती मध्यम प्रकल्प विभागांतर्गत लघु पाटबंधारे उपविभाग धारणीअंतर्गत सदर कामे करण्यात येणार आहे. यासाठी दारिद्ररेषेखाली कुटुंबांचे सर्व्हे करून २५ हेक्टर सिंचनाकरिता शेतीला त्याचा उपयोग होणार असल्याची माहिती आहे. अतिदुर्गम भागातील आदिवासी व दारिद्ररेषेखालील शेतकरी या योजनेचे लाभार्थी राहील, अशी संकल्पना अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी सर्वप्रथम मांडली होती व पी. एल. बोंगिरवार यांनी या संदर्भात परिपत्रक तयार केले होते.
रबी हंगामासाठी अदिवासींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या भागातील डोंगराळ व उतारपाट असल्याने शेतकºयांना शेती करणे कठीण जाते. वेळेत पाणी मिळत नसल्याने शेती पिके खराब होतात व या भागात पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण होते. विशेषत: या ठिकाणी पाण्याचे मुबलक स्त्रोत कुठेही नसतात. त्यामुळे शेतीला पाणी मिळत नाही. पावसाळ्यातही येथील पाणी वाहून जाते. त्यामुळे या भागातील शेतकºयांना त्याचा फायदा होत नाही. या भागात नदीला वाहते पाणी असते. त्यामुळे ही योजना जलसंपदा विभागाच्यावतीने मॉडेल म्हणून धारणी तालुक्यात राबविण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.
दिया गावाला लाभ
धारणीपासूृन दिया हे गाव ४ किमीवर डोंगराळ भागात आहे. तेथून सिपना नदी वाहते. बाजूने धारणी ते बैरागड रस्ता असून धारणी तालुक्यातील २५ खेडी या रस्त्याने जोडण्यात आलेली आहे. सन १९९४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूरतर्फे सदर नदीवर पूल वजा बंधारा उभारण्यात आले होते. त्यामध्ये लोखंडी फळ्या टाकून पाणी अडविण्यात येते. गावालगत सन १९७३ मध्ये जलसंपदा विभागामार्फत उपसासिंचन योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याची विहीर बांधण्यात आली होती. तेथूनच विजेव्दारे पाणी उपसा करून शेतकºयांना सिंचनासाठी देण्यात येत होते. परंतु धारणीसारख्या अतिदुर्गम भागात विजेची शाश्वती नसल्यामुळे व शेतकºयांची आर्थिक स्थिी लक्षात घेता. शेतकरी देयकांचा भरणा करू शकले नाही. त्यामुळे विद्युत प्रवाह खंडित करण्यात आला. सदर उपसा सिंचन योजना बंद पडली. त्यामुळे शेतकरी सिंचनापासून वंचित राहिले. सोलरपंपाव्दारे पाण्याची योजना राबविण्यात येणार असल्याने या भागातील आदिवासी शेतकºयांना सिंचनाची व्यवस्था होणार आहे.
२१ बाय २१ चे शेततळे
राबविण्यात येणाऱ्या या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत २१ बाय २१ मीटर या प्रकाराचे शेततळे शासकीय जमिनीवर खादून त्यामध्ये प्लास्टिक अंथरूण मातीत झाकून यामध्ये सौर ऊर्जेच्या पंपाव्दारे बंधाऱ्यामधील पाण्याचा उपसा केला जाईल. ते पाणी शेततळ्यात साठविण्यात येणार आहे. त्यानंतर गुरूत्वाकर्षणाच्या साह्याने पाईपलाऊनव्दारे शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचविण्यात येणार आहे. सदर योजना ही प्रायोगिक तत्त्वावर त्राबविण्याचे नियोजन असून यापासून २५ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. तसेच सदर योजनेवर पाणी संस्था व्यवस्थापन करून सदर हस्तांतरित करण्यात येईल. ही योजना यशस्वी झाल्यास संपूर्ण राज्यामध्ये मॉडल म्हणून राबविण्यात येणार आहे.

ही अतिशय चांगली योजना आहे. यामुळे आदिवासीबहुल भागातील शेतकºयांच्या शेतीला सिंचनाची व्यवस्था होणार आहे. योजना यशस्वी झाल्यानंतर पुढे राज्यभर मॉडेल म्हणून राबविण्याचा शासनाचा मानस आहे.
- रमेश ढवळे,
अधीक्षक अभियंता, अमरावती

Web Title:  Solar Power Power to Lift Irrigation Scheme in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.