खेड येथे सौरऊर्जा प्रकल्पाच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:17 PM2018-05-24T22:17:59+5:302018-05-24T22:17:59+5:30
मोर्शी तालुक्यातील आमदार आदर्श गाव योजनेत समाविष्ट खेड येथे आ.डॉ. अनिल बोंडे यांच्या प्रयत्नाने ३० मेगावॅट विद्युत निर्मितीकरिता सौरऊर्जा प्रकल्प उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : मोर्शी तालुक्यातील आमदार आदर्श गाव योजनेत समाविष्ट खेड येथे आ.डॉ. अनिल बोंडे यांच्या प्रयत्नाने ३० मेगावॅट विद्युत निर्मितीकरिता सौरऊर्जा प्रकल्प उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील किमान ५० गावाांन लाभ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
खेड येथे ८५ एकर शासकीय जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याकरिता मोर्शी मतदारसंघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी जानेवारी महिन्यात घोषणा केली होती. वरूड तालुक्यातील गव्हाणकुंडप्रमाणे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ पोहचविण्यासाठी खेड येथे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या अनुषंगाने महावितरणचे कार्यकारी अभियंता जाधव, कनिष्ठ अभियंता रिठे यांचे नेतृत्वात त्यांच्या अधिनस्त चमूने जागेची पाहणी केली.
शेतकºयांना शेतीच्या सिंचनाकरिता दिवसाढवळ्या १२ तास विद्युत पुरवठा मिळावा, हा हेतू आ. डॉ. बोंडे यांनी व्यक्त केला असून, खेड विद्युत उपकेंद्राचा मोठ्या प्रमाणात फायदा खेड, उतखेड, तरोडा, आष्टोली, डोमक, कोळविहीर व रायपूर या गावांना होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार आदर्श गाव योजनेचे समन्वयक दिनेश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाडा-घाटलाडकी मार्गावर मौजा खेड भागातील ८५ एकर ई-क्लास जमिनीची याकरिता निवड करण्यात आली आहे.
महसूल विभागातर्फे सदर जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या जागेवर ३० मेगावॅट विद्युत निर्मितीचा प्रस्ताव महाराष्टÑ शासनाला सादर करण्यात आल्याने या विद्युत प्रकल्प हालचालींना वेग आला असून, शेतकºयांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.