अपिलीय सावकारी प्रकरणात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:42 PM2019-07-22T23:42:26+5:302019-07-22T23:43:57+5:30

महाराष्ट्र सावकारी अधिनियमान्वये दाखल अपिलीय प्रकरणात विभागीय सहनिबंधकांद्वारे शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याची तक्रार सावकारग्रस्त अन्याय समितीद्वारे शासनाकडे करण्यात आली. याप्रकरणी सहकारी संस्थांचे अपर निबंधक डॉ. नागनाथ यगलेवाड यांनी २० जुलैच्या पत्रान्वये विभागीय सहनिबंधक आर.जे. दाभेराव यांना मुद्देनिहाय खुलासा उलटटपाली मागितला आहे.

Solicitation of Appellate Creditors | अपिलीय सावकारी प्रकरणात घोळ

अपिलीय सावकारी प्रकरणात घोळ

Next
ठळक मुद्देशासनाकडे तक्रार : अपर निबंधकांनी मागितला खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाराष्ट्र सावकारी अधिनियमान्वये दाखल अपिलीय प्रकरणात विभागीय सहनिबंधकांद्वारे शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याची तक्रार सावकारग्रस्त अन्याय समितीद्वारे शासनाकडे करण्यात आली. याप्रकरणी सहकारी संस्थांचे अपर निबंधक डॉ. नागनाथ यगलेवाड यांनी २० जुलैच्या पत्रान्वये विभागीय सहनिबंधक आर.जे. दाभेराव यांना मुद्देनिहाय खुलासा उलटटपाली मागितला आहे.
विभागातील सर्व जिल्ह्यांत दाखल महाराष्ट्र सावकारी अधिनियमान्वये दाखल प्रकरणात जिल्हा उपनिबंधकांद्वारे शेतकºयाच्या बाजूने निवाडा मिळाला आहे. मात्र, अपिलीय बहुतांश प्रकरणात शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे. यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करीत सावकारग्रस्त अन्याय समितीद्वारे या प्रकरणाची फेरचौकशी निवृत्त न्यायाधीशामार्फत करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली. याच कार्यालयात एका विशिष्ट विधिज्ञाच्या माध्यमातून व्यवहार झाल्यास निकाल सकारात्मक लागतो. त्यामुळे ज्या प्रकरणात हे विधिज्ञ आहेत, त्या सर्व प्रकरणांची फेरचौकशी करण्याची मागणीदेखील समितीद्वारे शासनाकडे करण्यात आली.
याप्रकरणी सहकार विभागाचे अवर सचिव मं.ग. जोशी यांनी तक्रारीच्या अनुषंगाने २६ मे रोजीच्या पत्रान्वये स्वयंस्पष्ट अहवाल पुणे स्थित सहकार आयुक्त व निबंधकांना मागितला आहे. अपर निबंधक (प्रशासन) यांच्याद्वारे अपर निबंधक (अंदाज व नियोजन) यांना १६ जुलैच्या पत्राद्वारे १५ दिवसांत या प्रकरणाचा स्वयंस्पष्ट अहवाल मागितला. अपर निबंधक नागनाथ यगलेवाड यांनी विभागीय सहनिबंधक आर.जे. दाभेराव व कार्यालय अधीक्षक डावरे यांना मुद्देनिहाय खुलासा आवश्यक ते सर्व कागदपत्रासह उलटटपाली मागितला.
१५ वर्षांपासून अधीक्षक एकाच ठिकाणी
विभागीय सहनिबंधक कार्यालयातील अधीक्षक डावरे हे मागील १५ वर्षांपासून विभागीय सहनिबंधक कार्यालयात आहेत. वर्षानुवर्षे एकाच कार्यालयात राहत असल्याने त्यांचाही अनेक प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप समितीद्वारे तक्रारीत करण्यात आला. माझ्या माध्यमातून जाल तरच काम होईल, असे ते बिनधास्तपणे सांगतात. विभागीय सहनिबंधकांची या कर्मचाऱ्यांवर एवढी मर्जी का, असा सवाल समितीने केला तसेच या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.

ही प्रशासकीय बाब आहे. या कार्यालयात कुठलीच अनियमितता झालेली नाही. याबाबतचा खुलासा, अहवाल व माहिती अपर निबंधकांना पाठविण्यात येईल.
- आर.जे.दाभेराव
विभागीय सहनिबंधक.

Web Title: Solicitation of Appellate Creditors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.