चिखलदऱ्यात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 01:22 AM2018-04-23T01:22:55+5:302018-04-23T01:22:55+5:30

स्वच्छ भारत अभियानांतर्गत चिखलदरा नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ६१.७४ लाख रुपये एकूण खर्च असलेल्या या प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा चिखलदरा नगर परिषद राहील.

 Solid Waste Management Project in Mud | चिखलदऱ्यात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

चिखलदऱ्यात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

Next
ठळक मुद्दे ६१.७४ लाखांचा खर्च : १४ व्या वित्त आयोगातून निधी खर्चाची मुभा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्वच्छ भारत अभियानांतर्गत चिखलदरा नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ६१.७४ लाख रुपये एकूण खर्च असलेल्या या प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा चिखलदरा नगर परिषद राहील.
राज्यातील ६० शहरांचा नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे सविस्तर प्रकल्प अहवालास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता देऊन ‘निरी’ या संस्थेने सदर प्रकल्पाचे मूल्यांकन अप्रायझल करण्यात आले आहे. ते प्रस्ताव शासन मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. त्यात चिखलदरा नगरपरिषदेने पाठविलेल्या प्रस्तावास हिरवी झेंडी मिळाली आहे. डीपीआरनुसार प्रकल्पाचे एकूण किंमत ६१.७४ लाख रुपये आहे. त्यापैकी २१.६० लाख केंद्र तथा १४.४० लाख रुपये केंद्र व राज्यसरकार देईल, तर २५.७२ लाख रुपये चिखलदरा न.प.ला खर्च करावे लागतील. १४ व्या वित्त आयोगातून हा निधी खर्च करण्यास पालिकेला मुभा देण्यात आली आहे. त्या खर्चाला नगरविकास विभागाने १२ एप्रिलला प्रशासकीय मान्यता दिल्याने प्रकल्पाची अंमलबजावणी सुकर झाली आहे. डीपीआरनुसार प्रकल्पाची अंमलबजावणी करताना शहरात निर्माण होणाºया घनकचºयाचे निर्मितीचा जागीच १०० टक्के विलगीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय विलगीकरण केलेल्या कचºयाची विलगीकृत पद्धतीने वाहतूक करणे अनिवार्य आहे.
कचरा संकलन व वाहतुकीवर ९.३९ लाख
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत कचरा संकलन व वाहतुकीवर ९.३१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यात वाहनांची खरेदीसुद्धा आहे. २.१४ लाख डंपिंग यार्डमील बांधकाम व विंड्रो फ्लॅटफॉर्मवर ६.२४ लाख रुपये खर्च होतील. वेस्ट डिस्पोझलसाठी ३.९१ लाख व १७.४३ लाख रुपये साइट डेव्हलमेंटवर खर्च होतील. यात शौचालय, ड्रेनेज, हरित क्षेत्रविकास अग्निसुरक्षा, पाणीपुरवठाचा समावेश असेल व प्रकल्पातील उपकरणे, वाहने व यंत्रसामग्रीवर १६.९९ लाख रुपये खर्च होतील.

Web Title:  Solid Waste Management Project in Mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.