कधी पैशांसाठी पाऊस, तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती, अंधश्रद्धेचे भूत उतरणार तरी कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:15 AM2021-08-26T04:15:22+5:302021-08-26T04:15:22+5:30
असाईनमेंट पान ४ अमरावती : कधी पैशांसाठी पाऊस, तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती केल्याचा दावा केला जातो. त्यात अनेक जण ...
असाईनमेंट पान ४
अमरावती : कधी पैशांसाठी पाऊस, तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती केल्याचा दावा केला जातो. त्यात अनेक जण झपाटले जातात. नरबळीपर्यंत त्यांची मजल जाते; मात्र अघोरी पूजा केली की, पैशाचा पाऊस पडला, असे होत नाही, कधी झाले नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समिती असो वा दाभोळकर, पानसरे असोत, सुधारक, पुरोगाम्यांनी भानामती, जादूटोण्याचे दावे सप्रमाण फेटाळले आहेत; मात्र अलिकडच्या काही घटना पाहता भानामतीचे ते भूत उतरणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
///////////
सन २०१३ मध्ये झाला कायदा
महाराष्ट्र नरबळी व इतर अमानवी, अघोरी प्रथा, जादूटोणा निवारण व उच्चाटन कायदा २०१३, जो सामान्यत: अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणून ओळखला जातो, तो राज्यात २६ ऑगस्ट २०१३ पासून अमलात आला. या कायद्यान्वये गुन्हे दाखल केले जातात; मात्र अपवादात्मक स्थितीत या कायद्यान्वये गुन्हे दाखल केले जातात.
/////////म्हणे पैशाचा पाऊस पाडतो
अचलपूर तालुक्यातील सावळी येथील सपन हनुमान मंदिर परिसरात पैशाचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा घालण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यासाठी एका १६ वर्षीय मुलीला भरीस घालण्यात आले. त्या प्रकरणात दहा जणांविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळाहून बाहुली, रक्ताळलेले कपडे, मिरच्या जप्त करण्यात आल्या होत्या.
//////////////
घटना दुसरी
डिसेंबर २०२० मध्ये टाकरखेडा पूर्णा येथील एका कुटुंबीयाने त्यांच्या घरात भानामतीमुळे आग लागत असल्याचा दावा केला होता. त्या कुटुंबीयाने सपशेल माफी मागितल्याने त्या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला नाही. धारणीतील एका डम्मा प्रकरणात एका वृद्धेविरुद्ध या कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
//////////////
१) जिल्ह्यात या कायद्यान्वये जे गुन्हे दाखल झालेत, त्यात मेळघाटातील डम्मा या उपचार पद्धतीशी संलग्न असलेल्यांचा सर्वाधिक समावेश आहे.
२) करणी केली म्हणून एखाद्या स्त्री-पुरुषाविरुद्ध तक्रार दाखल केली जाते; मात्र त्यात साधा मारहाणीचा, शिवीगाळचा गुन्हा नोंदविला जातो.
//////////
कोट