वडिलांच्या तेरवीपश्चात मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:15 AM2021-01-20T04:15:06+5:302021-01-20T04:15:06+5:30
वरूड : वडिलांच्या तेरवीच्या दुसऱ्या दिवशी वकील मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना येथे मंगळवारी घडली. मंगेश प्रल्हादराव भोगे असे ...
वरूड : वडिलांच्या तेरवीच्या दुसऱ्या दिवशी वकील मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना येथे मंगळवारी घडली. मंगेश प्रल्हादराव भोगे असे मृताचे नाव आहे.
मंगेश भोगे यांचे वडील प्रल्हादराव संपतराव भोगे (८२, रा. वरूड) यांचा १५ दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. १७ जानेवारी रोजी त्यांच्या तेरावीचा कार्यक्रम पार पडला. १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मंगेश यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, मंगेश भोगे यांची प्राणज्योत मावळली. भोगे कुटुंबावर पंधराव्या दिवशी पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला. वरूड वकील संघाच्या सदस्यांसह आप्तस्वकीय, मित्र परिवाराने रुग्णालयात एकच गर्दी केली होती. स्थानिक केदारेश्वर मोक्षधाममधे अंत्यसंस्कार पार पडले. मंगेश यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा आप्तपरिवार आहे.