रुग्णाच्या नातेवाइकाला मारहाण, सोनोने हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:13 AM2021-05-08T04:13:05+5:302021-05-08T04:13:05+5:30

अमरावती : बिल जास्त का काढले, या कारणावरून रुग्णाच्या नातेवाइकाने चेंबरमध्ये डॉक्टरला धमकी देऊन त्यांच्या अंगावर चालून गेला, दोन ...

Sono beats patient's relative, Sono offends hospital staff | रुग्णाच्या नातेवाइकाला मारहाण, सोनोने हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा

रुग्णाच्या नातेवाइकाला मारहाण, सोनोने हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा

googlenewsNext

अमरावती : बिल जास्त का काढले, या कारणावरून रुग्णाच्या नातेवाइकाने चेंबरमध्ये डॉक्टरला धमकी देऊन त्यांच्या अंगावर चालून गेला, दोन नर्स आणि मेडिकलमधील मुलाला मारहाण केल्याची घटना गुरुवारी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील राठीनगर येथील सोनोने हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी नातेवाइकांच्या तक्रारीवरून हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांविरुद्ध, तर डॉक्टरांच्या तक्रारीवरून रुग्णाचा नातेवाईक असलेल्या एका इसमाविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

पोलीस सूत्रांनुसार, डॉ. नितीन विजयकुमार सोनोने (३६, रा. सोनोने हॉस्पिटल, राठीनगर) यांच्या तक्रारीवरून आरोपी मनोज मधुकर वानखडे (४५, रा. रमाबाई आंबेडकरनगर) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ४५२, २९४, ५०६(ब), ५०४ सहकलम ३ महाराष्ट्र वैद्यकीय हिंसाचार प्रतिबंध अधिनियमनुसार गुन्हा नोंदविला गेला. सदर आरोपी हा डॉक्टरांना भेटायचे आहे, असे सांगून हॉस्पिटलमध्ये आला. त्यानंतर त्याने पेशंटचे बिल कमी करण्यासंदर्भात डॉक्टर सोनोने यांना धमकाविले. पेशंटला कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे आहे, असे सांगितल्यानंतरही आरोपी हा डॉ. सोनोने यांच्या अंगावर धावून आला. तेथे उपस्थित परिचारिकांच्याही कानशिलात लगावली व त्यांना मारहाण केली. यावेळी नितीन देसाई नामक कर्मचाऱ्याने आरोपीला चेंबरबाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यालाही मारहाण करण्यात आली. मनोजने दवाखान्याला आग लावण्याची धमकी दिल्याचेही डॉक्टरांनी तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी रुग्णाचा नातेवाईक मनोज वानखडे (४५, रा. रमाबाई आंबेडकरनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून डॉ. सोनोने हॉस्पिटलमधील दोन नर्स व मे़डिकलमधील मुलाविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. तक्रारीनुसार, मनोज वानखडे हे नातेवाईक रुग्णाला भेटण्यास गेले होते. रुग्णाच्या उपचाराचे ७० हजारांचे बिल कमी करण्याची विनंती केली. पैसे भरण्याची ऐपत नाही तर येथे भरती करता कशाला? सुपर स्पेशालिटीत घेऊन जा, अशी हुज्जत घालून सर्व त्यांच्या अंगावर आले. त्यांना गालावर थप्पड लगावल्या. बचावासाठी हात अडविला असता, मेडिकलमधील मुलगा व दोन नर्स यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे मनोज वानखडे यांनी तक्रारीत म्हटले. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनीषा सामटकर करीत आहेत.

Web Title: Sono beats patient's relative, Sono offends hospital staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.