जामीन मिळताच राहुटीत परतले बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:28 PM2018-01-17T23:28:23+5:302018-01-17T23:28:55+5:30

न्यायालयातून जामीन मिळताच आ. बच्चू कडू त्यांचा मतदारसंघातील राहुटी उपक्रमात परतले. न्यायालय परिसरातही निवेदन देणारे व तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांनी त्यांना गारडा घातला होता.

As soon as the bail is granted, the Bacchu Kadu is back | जामीन मिळताच राहुटीत परतले बच्चू कडू

जामीन मिळताच राहुटीत परतले बच्चू कडू

Next
ठळक मुद्देगराडा : न्यायालय परिसरात समस्या मांडल्या

आॅनलाईन लोकमत
परतवाडा : न्यायालयातून जामीन मिळताच आ. बच्चू कडू त्यांचा मतदारसंघातील राहुटी उपक्रमात परतले. न्यायालय परिसरातही निवेदन देणारे व तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांनी त्यांना गारडा घातला होता. चेहºयावरचे स्मित कायम ठेवत नागरिकांच्या समस्यांचा निपटारा त्यांनी तेथेच सुरू केला.
‘आमदाराची राहुटी आपल्या गावात’ हा उपक्रम चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे सुरू आहे. आ. कडू हे बुधवारी राहुटीतून अचलपूर न्यायालयात हजर झाले. त्यांच्यासह प्रहारचे गजानन भोरे, संजय तट्टे, प्रवीण पाटील, विलास भागवत, बंटी ककरानिया, गोपाल खोलापुरे, रवि अरबट, साहेबराव मेहरे, शंभू मालठाणे, बाबा शेरेकर, श्याम कडू, भास्कर मासोदकर, बाळासाहेब खडसे, राणा तट्टे आदी समर्थक उपस्थित होते.
जामिनावर बाहेर आलेल्या आ. बच्चू कडूंची माहिती घेत काही समस्याग्रस्त नागरिक, निवेदनकर्ते चक्क न्यायालयात पोहोचले आणि आपल्या समस्या मांडल्या.
आमदारकी गेली तरी बेहत्तर
अपघातात चौघांचे बळी गेल्यानंतर बसस्थानकाजवळ ट्रॅव्हल्स व काळी-पिवळी हटविण्याचे शिपायाला म्हटले होते. जनतेच्या कामासाठी आमदारकी गेली तरी बेहत्तर. एक महिन्याचा अवधी असून उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे आ. बच्चू कडू म्हणाले.

Web Title: As soon as the bail is granted, the Bacchu Kadu is back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.