केंद्रीय समिती आल्यापावलीच परतली, स्वागतासाठी सज्ज ग्रामपंचायतींचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:15 AM2021-08-22T04:15:59+5:302021-08-22T04:15:59+5:30
केंद्रीय संसदीय समिती जिल्ह्यात खासदार प्रतापराव जाधव यांंच्या अध्यक्षतेखाली दाखल झाली होती. वरूड दौऱ्यामध्ये रोजगार हमी योजना, ग्रामपंचायतींच्या कामाचा ...
केंद्रीय संसदीय समिती जिल्ह्यात खासदार प्रतापराव जाधव यांंच्या अध्यक्षतेखाली दाखल झाली होती. वरूड दौऱ्यामध्ये रोजगार हमी योजना, ग्रामपंचायतींच्या कामाचा आढावा, स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य विभाग, बँका यांना भेटी घेऊन निरीक्षण करण्याकरिता संसदीय समिती १७ ऑगस्टला आली होती. दुपारी साडेतीन वाजता पोहचलेल्या समितीची जेवणाची व्यवस्था महेंद्री विश्रामगृहावर केली होती. दौऱ्यामध्ये जरूड, बेनोडा आणि सावंगी ग्रामपंचायती तसेच काही बँकांची तपासणी होणार होती. मात्र, जेवणानंतर ही समिती थेट निघून गेल्याने नागरिकांना केवळ १५ वाहनांचा ताफा तेवढा पाहावयास मिळाला. मात्र, वरुड तालुक्यात रोजगार हानी योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार असताना या समितीने दाखल न घेणे हा चर्चेचा विषय आहे. दुसरीकडे पाऊस सुरू असल्याने समिती निघून गेल्याचे अधिकारी सांगतात .