वीरेंद्र जगताप यांनी मांडल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा

By Admin | Published: May 12, 2016 12:27 AM2016-05-12T00:27:09+5:302016-05-12T00:27:09+5:30

नांदगाव तालुक्यात झालेला गारपीट व वादळाच्या नुकसानीची व्यथा आज आ.वीरेंद्र जगताप यांनी तहसीलदार बी.व्ही. वाहुरवाघ यांच्या समोर मांडली

Sore of the hailstorm affected farmers by Virendra Jagtap | वीरेंद्र जगताप यांनी मांडल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा

वीरेंद्र जगताप यांनी मांडल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा

googlenewsNext

पाहणी : कृषी विभागांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना
नांदगाव खंडेश्वर : नांदगाव तालुक्यात झालेला गारपीट व वादळाच्या नुकसानीची व्यथा आज आ.वीरेंद्र जगताप यांनी तहसीलदार बी.व्ही. वाहुरवाघ यांच्या समोर मांडली व महसूल, कृषी, पंचायत विभागाने संयुक्तरीत्या नुकसानीच पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करावी, अशा सूचना दिल्या. त्यासाठी त्यांनी तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कृषी सहायकांमार्फत संयुक्तरीत्या सर्वेक्षण करावे, अशा सूचनासुद्धा दिल्यात.
पहूर, शिवणी, येवण, कानस, फुबगाव, रोहणा जावरा व तालुक्यातील ज्या गावांत कृषी पंपांचा पुरवठा वापर वाढल्यामुळे खंडित झाला तो तातडीने पूर्ववत करावा, अशा सूचना वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्यात. ९ मे रोजी झालेल्या वादळ व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील लिंबू, संत्रा, केळी, पपई, कांदा, भाजीपाला इत्यादी पिकांचे झालेल्या प्रचंड नुकसान झाल्याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आ.जगताप यांच्यासमोर माहिती कथन केली होती. त्याची दखल घेऊन मंगळवारी ते नांदगाव तहशीलमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या समवेत तालुक्यातील बऱ्यांच गावांतील शेतकरी मंडळी होती.
यावेळी गटविकास अधिकारी सुरज गोहाड, तालुका कृषी अधिकारी नंदकिशोर भागवत, विद्युत कंपनीचे उपविभागीय अधिकारी प्रदीप अंधारे ही अधिकारी मंडळी उपस्थित होती.
याप्रसंगी राजेंद्र सरोदे, मनीष जगणे, नितीन इंगोले, अमोल नरोडे, मनोहर बगळे, विकास सरोदे, विलास इंगोले, कैलास लांडे, अजय भोयर, नंदू भडके, किसन कणसे, गौतम सोनोने, अनिल कणसे, बंडू जाधव, हितेश चौधरी, दिलीप तायडे, रशीद, संजय पोफळे, अमोल मारोटकर, इद्रिस, सुनील झंझळकर, सुनील तिखिले, विमल पवार व तालुक्यातील माहुली चोर, कठोडा, जामगाव, नांदसावंगी, सातरगाव, सावनेर, येनस, रोहणा, नांदगाव व तालुक्यातील बरीच शेतकरी मंडळी त्यांच्यासोबत होती. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Sore of the hailstorm affected farmers by Virendra Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.