पालकमंत्र्यांसमोर मांडल्या फासेपारधी समाजाच्या व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:15 AM2018-01-23T00:15:12+5:302018-01-23T00:15:36+5:30
फासेपारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी सोमवारी महाराष्ट्र आदिवासी फासेपारधी समाज संघटनेचे अध्यक्ष मतीन भोसले यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनाद्वारा केली आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : फासेपारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी सोमवारी महाराष्ट्र आदिवासी फासेपारधी समाज संघटनेचे अध्यक्ष मतीन भोसले यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनाद्वारा केली आहे.
राज्य शासनाकडून लोककल्याणकारी अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र, या योजनांचा लाभ फासेपारधी समाजाला मिळत नाही. त्यामुळे अद्यापही हा समाज विकासापासून वंचित आहे. या समाजाला न्याय देण्यासाठी राज्य शासना मार्फत शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास घडवून आण्यासाठी जिल्हा परिषद, आदिवासी विकास विभाग, महसूल विभाग, पशुसंवर्धन, कृषी, शिक्षण, समाजकल्याण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच अन्य विभागातून लोकहितार्थ राबविण्यात येणाºया सर्वच शासकीय योजनांचा लाभ फासेपारधी समाजाला मिळावा, या दृष्टीने शासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी मतीन भोसले यांनी २२ जानेवारी रोजी पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
मंगरूळ चव्हाळा येथे जय शिवाई महिला बचतगट आहे. या गटाला कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी शेड बांधकाम करण्यासाठी शासकीय अनुदास पात्र आहेत. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे हा अन्याय दूर करावा व योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाºयांवर कारवाई करावी, घरकुल योजनेतही फासेपारधी समाजातील लाभार्थी पात्र असताना त्यांना प्रशासनाकडून सहकार्य केले जात नाही. त्यामुळे अद्यापही मंज़ूर असलेल्या घरकुलाचे कामे सुरू झाली नाहीत. ती सुरू करावी, यांसह अन्य मागण्यांकडे लोकप्रतिनिधी व अधिकाºयांचे लक्ष वेधून न्याय देण्याची मागणी मतीन भोसले यांनी केली आहे.
यावेळी नूरदास भोसले, गजानन पवार, रंजित पवार, ललिता भोसले, चंद्रशेखर पवार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.