ज्वारीची श्रीमंती वाढली; गव्हापेक्षाही अधिक भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:16 AM2021-07-14T04:16:36+5:302021-07-14T04:16:36+5:30

बड़नेरा( श्यामकांत सहस्त्रभोजने ) पूर्वी गोरगरिबांचे धान्य म्हणून ज्वारीची ओळख होती जास्तीत जास्त भाकरीच खाल्ल्या जात होत्या सणासुदीलाच पोळ्या ...

Sorghum wealth increased; More than wheat! | ज्वारीची श्रीमंती वाढली; गव्हापेक्षाही अधिक भाव!

ज्वारीची श्रीमंती वाढली; गव्हापेक्षाही अधिक भाव!

Next

बड़नेरा( श्यामकांत सहस्त्रभोजने )

पूर्वी गोरगरिबांचे धान्य म्हणून ज्वारीची ओळख होती जास्तीत जास्त भाकरीच खाल्ल्या जात होत्या सणासुदीलाच पोळ्या केल्या जात असे सद्या ज्वारीचे दर गव्हापेक्षा अधिक असताना सुद्धा निरोगी आरोग्यासाठी भाकरीची डिमांड प्रचंड वाढली आहे गव्हापेक्षा अलीकडे ज्वारीची श्रीमंती अधिक असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

पूर्वी गव्हापेक्षा ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असे शेतकऱ्यांना त्याचा पेरणी पासून ते उगवणीचा खर्च परवडणारा होता पर्यायाने बहुतांश लोक गव्हापेक्षा ज्वारीचाच अधिक वापर करीत होते वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी ज्वारी आणि कापूस हेच प्रमुख पिक होते सध्या सोयाबीन कापूस तुर या पिकांना शेतकरी महत्व देत आहे पूर्वीच्या प्रमाणात केवळ पंधरा टक्के ज्वारीचे सध्या उत्पादन घेतल्या जात आहे नाममात्र उत्पादन असल्याने त्याची दरवाढ झालेली आहे ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे आहार तज्ञांचे म्हणने आहे ज्वारीची भाकरी अलीकडच्या काळात ब्रँड झाली आहे हॉटेल्समध्ये भाकरीला मागणी आहे अधिक दर देऊन लोक त्याचा आस्वाद घेत असतात तेव्हा ज्वारीची श्रीमंती वाढली असेच म्हणावे लागेल निरोगी आरोग्यासाठी आता शहरी तसेच ग्रामीण भागात ज्वारीची भाकरी खाण्यावर अधिक भर दिसून पडतो आहे गव्हाच्या पोळी पासून देखील आरोग्याला मोठा फायदा आहे

------------------

प्रतिक्रिया

*भाकरीच परवडायची म्हणून खायचो-

1) आमच्या काळात गव्हाच्या तुलनेत ज्वारी खूप स्वस्त होती त्याचे उत्पादनदेखील बरेच होते ज्वारी देऊन कामे देखील करवून घेतल्या जात होती पैशाची बचत व पोस्टिकते मुळे भाकरीच खाल्ल्या जात होत्या.

दिलीप नेव्हारे

चोर माहुली.

2) पूर्वी पोळीच्या तुलनेत ज्वारीची भाकरी खाल्ल्या जात होती आर्थिक दृष्ट्या परवडणारी असे त्यावेळेस ज्वारीचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात होत असे भाकरी खाल्ल्याने शरीर कसदार बनते पोस्टीकतेने भरपूर असते.

सुनील मोहतुरे

बड़नेरा.

-----------------------

प्रतिक्रिया-

* आता गव्हाची पोळी परवडते*

1) भाकरी जेवणात सेवन करने शरीरासाठी लाभदायक असले तरी महागाईमुळे ज्वारी विकत घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही ज्वारीपेक्षा गव्हाचे दर कमी झाले आहे व सहज उपलब्ध असल्याने वापर अधिक केल्या जातो.

नागोराव राऊत

चोर माहुली.

२) ज्वारीच्या उत्पादनात अलीकडच्या काळात घट झाल्याने तसेच गव्हाचे उत्पादन अधिक प्रमाणात असल्याने जेवणामध्ये पोळीचा वापर केल्या जातो शासनाने रेशन मध्ये ज्वारीचे वितरण करायला पाहिजे ज्वारी नामशेष झाली आहे.

लीलाधर ठवकर

बड़नेरा.

---------------------

* जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन घटले*

जिल्ह्यात पूर्वी मुख्य पीक म्हणून ज्वारी कडे पाहिल्या जात होते कालांतराने शेतीमध्ये नवनवे तंत्रज्ञान विकसित झाले शेतकरी नवनवीन पिकांची लागवड करू लागला अलीकडच्या काळात गव्हाचे उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतल्या जात आहे त्यामुळे ज्वारीला दुय्यम स्थान मिळत आहे. पक्षी ज्वारीच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी देखील करीत असतात शेतकऱ्याला त्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागते.

--------------------------

* आरोग्यासाठी ज्वारीला पसंती*

1) उच्च रक्तदाब हृदयासंबंधी आजारांच्या समस्या अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे यावर मात करण्यासाठी आहारात ज्वारीचे सेवन गरजेचे आहे.

2) ज्वारी मधील गुणकारी तत्व रक्तदान नियंत्रण ठेवते तसेच आजारी व्यक्तींनी देखील भाकरीचे सेवन करावे असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

3) भाकरी खाल्ल्याने ॲसिडिटीचा त्रास होत नाही शिवाय पचनासाठी उत्तम आहे भाकरी खाण्याचे अनेक फायदे आहेत.

----------------------

* अशी वाढली ज्वारीची श्रीमंती (प्रतिक्विंटल दर)

१)1980 सालामध्ये ज्वारी-115/-

गहु-140/-

2)1990 सालामध्ये ज्वारी- 200/-

गहु- 225/-

3)2000 सालामध्ये ज्वारी-575/-

गहु- 600/-

4)2010 सालामध्ये ज्वारी-900/-

गहु-1200/-

5)2020 सालामध्ये ज्वारी-2700/-

गहु-1950/- रुपये

6)2021 सालामध्ये ज्वारी-3100/-

गहु- 2400/-

----------------

Web Title: Sorghum wealth increased; More than wheat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.