आम्हाला माफ करा, चूक झाली..! रेट्याखेडा अंधश्रद्धा प्रकरणी गावकऱ्यांनी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 11:44 IST2025-01-22T11:43:50+5:302025-01-22T11:44:45+5:30

Amravati : पोहोचले लोकमत, झाले एकमत, रेट्याखेडा येथील ग्रामस्थांनी मागितली माफी

Sorry, we made a mistake..! Villagers apologize for Retyakheda superstition case | आम्हाला माफ करा, चूक झाली..! रेट्याखेडा अंधश्रद्धा प्रकरणी गावकऱ्यांनी मागितली माफी

Sorry, we made a mistake..! Villagers apologize for Retyakheda superstition case

नरेंद्र जावरे 
लोकमत न्यूज नेटवर्क 
रेट्याखेडा (चिखलदरा) :
गावात घडलेली घटना निंदनीय आहे. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन आमच्याकडून चूक झाली आहे. आम्हाला माफ करा. यानंतर असे होणार नाही. आम्ही झालेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त करतो. म्हाताऱ्या आजीचा औषधोपचार करू. कुठल्याच प्रकारचा द्वेषभाव न ठेवता आम्ही सर्व गावकरी एकोप्याने, एका कुटुंबाप्रमाणे राहू, या शपथेसह संपूर्ण गावकऱ्यांनी शेलूकर कुटुंबाची पाया पडून माफी मागितली. 


लोकमतने चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा येथील घटना उघडकीस आणल्यानंतर ग्रामस्थांना उपरती झाली आणि मंगळवारी त्यांच्यात माफीबद्दल एकमत झाले. दरम्यान आदिवासी वृद्ध महिलेची धिंड काढणारा पोलिसपाटील बाबू जामूनकर याला पोलिसपाटील पदावरून मंगळवारी बडतर्फ करण्यात आले. ही कार्यवाही सहायक जिल्हाधिकारी तथा धारणीच्या उपविभागीय अधिकारी प्रियवंदा म्हाडदळकर यांनी केली आहे.


लोकमतची चर्चा 
लोकमतने रेट्याखेडा येथील घटनाक्रम उघडकीस आणल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ माजली होती. रेट्याखेड्यातही अनेक जण घटनेचे वृत्तांकन वाचताना दिसून आले, तर अधिकारीसुद्धा त्या वृत्ताबद्दल चर्चा करीत होते.


दवंडीवर आले गावकरी 
मागील चार दिवसांपासून दहशतीखाली असलेल्या रेट्याखेडा गावात पोलिसांच्या चकरा वाढल्या. परिणामी भीतीपोटी गावकरी गावाबाहेर निघून गेले होते. गावसभा ठरविल्यानंतर मंगळवारी दुपारी २ वाजता काही प्रमाणात त्यांनी उपस्थिती दर्शविली. गावातीलच एका झाडाखाली ही सभा भरली.


 

Web Title: Sorry, we made a mistake..! Villagers apologize for Retyakheda superstition case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.