‘एसओएस’चा पुष्कर जिल्ह्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:16 PM2018-05-26T23:16:01+5:302018-05-26T23:16:59+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) बोर्ड नवी दिल्ली अंतर्गत घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. जिल्ह्यात या अभ्यासक्रमाच्या पाच शाळा आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) बोर्ड नवी दिल्ली अंतर्गत घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. जिल्ह्यात या अभ्यासक्रमाच्या पाच शाळा आहेत. यामध्ये स्कूल आॅफ स्कॉलर्सचा पुष्कर मानकर ९३.६ टक्के गुण मिळवूण जिल्ह्यात प्रथम आला, तर जवाहर नवोदय केंद्रीय विद्यालयाचा राहुल अगारकर व स्कूल आॅफ स्कॉलर्सचा चैतन्य वानखडे ९३.४ टक्के गुण घेऊन व्दितीय, तर नवोदयचीच पायल राठोड ९३.२ टक्के गुण मिळवून तृतीय राहिली. सीबीएसई बोर्डामार्फत ५ मार्च ते २७ एप्रिल दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा आॅनलाइन निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
स्कूल आॅफ स्कॉलर्सचा १०० टक्के निकाल
सीबीएसई बोर्ड अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये पुष्कर मानकर ९३.६, चैतन्य वानखेडे ९३.४ व अंकित अग्रवाल ९२ टक्के गुण मिळाले. प्राचार्य सुरेश लकडे, उपप्राचार्य समिधा नहर आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
महर्षी पब्लिक स्कूलचा शतप्रतिशत निकाल
सीबीएसई बोर्ड अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत महर्षी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. यावर्षीसुद्धा १२ वी तिसऱ्या बॅचचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यामध्ये दीपांशू कडू ९१ टक्के, राघव सोमानी ८६ टक्के, रुग्वेद वाट ८४ टक्के, अस्मिता हजारी ८४ टक्के, शगून अग्रवाल ८० टक्के, तनय कोहळे ७९ टक्के या विद्यार्थ्यांचे यशाचे कौतुक केले जात आहे.
पोटे इंटरनॅशनल स्कूलचे उल्लेखनीय यश
पी. आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांमध्ये सृष्टी भारती ९१ टक्के, प्रतीक देऊळकर ९० टक्के या व्यतिरिक्त ८० टक्केच्यावर चिरायुष निकोसे ८४ टक्के, विनीत काळे ८४ टक्के, रसिका सावरकर ८३ टक्के, सय्यद ओसामा काशीद ८१ टक्के तसेच ७० टक्केच्यावर एकूण २२ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. २०१७-१८ मध्ये एकूण ७३ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. यापैकी शाळेचा निकाल ८१ टक्के लागला. विशेष म्हणजे सी.बी.एस.ई. बारावीची ही पहिलीच बॅच होती. यामुळे पहिल्याच वर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
जवाहर नवोदय केंद्रीय विद्यालय
येथील जवाहर नवोदय केंद्रीय विद्यालयाचा निकाल ७९.७१ टक्के लागला. यावर्षी ६७ विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ वीची परीक्षा दिली असून, सर्वच पास झाल्याची माहिती प्राचार्य मेश्राम यांनी दिली. यामध्ये राहुल आगरकर ९३.४, पायल राठोड ९३.२, शशीकांत तायडे ९२.२, देवेश देशमुख याला ९०.६ टक्के गुण मिळाले. यासाळेत ४ विद्यार्थी ९० ते ९५ टक्के, ४८ विद्यार्थी ७५ ते ८९ टक्के व १५ विद्यार्थी ६० ते ७४ श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.