खरिपाची ९५ टक्के क्षेत्रात पेरणी
By admin | Published: August 22, 2015 12:39 AM2015-08-22T00:39:54+5:302015-08-22T00:39:54+5:30
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ७ लाख १४ हजार ९५० क्षेत्राचे कृषी विभागाचे नियोजन असताना १९ आॅगस्टअखेर ६ लाख ७७ हजार ४४६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे.
अमरावती : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ७ लाख १४ हजार ९५० क्षेत्राचे कृषी विभागाचे नियोजन असताना १९ आॅगस्टअखेर ६ लाख ७७ हजार ४४६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. हे क्षेत्र एकूण सरासरी क्षेत्राच्या ९४.७५ टक्के आहे. अपेक्षित क्षेत्रापेक्षा अधिक ११० टक्के पेरणी नांदगाव तालुक्यात झाली. सर्वात कमी ७२ टक्के क्षेत्रात पेरणी अचलपूर तालुक्यात झाली आहे.
यंदाचा खरीप पेरणी हंगामाचा कालावधी जवळजवळ संपत आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पेरणीक्षेत्र असणाऱ्या सोयाबीन व कापूस पिकांचा पेरणी कालावधी संपला आहे. अशा स्थितीत धारणी तालुक्यात ४५ हजार ९४० हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे.
चिखलदरा तालुक्यात २३ हजार ४३० हेक्टर, अमरावती तालुक्यात ५३ हजार १६५ हेक्टर, भातकुली तालुक्यात ४८ हजार ६४५ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ६४ हजार १८७ हेक्टर, चांदूररेल्वे तालुक्यात ३९ हजार ५८९ हेक्टर, तिवसा तालुक्यात ४२ हजार ४९६ हेक्टर, मोर्शी तालुक्यात ५७ हजार ८७३ हेक्टर, वरूड तालुक्यात ४६ हजार ९११ हेक्टर, दर्यापूर तालुक्यात ६७ हजार ४३२ हेक्टर, अंजनगाव तालुक्यात ४२ हजार ४२० हेक्टर, अचलपूर तालुक्यात ४१ हजार ६९२ हेक्टर, चांदूरबाजार तालुक्यात ५१ हजार ५७४ हेक्टर व धामणगाव रेल्वे तालुक्यात ५२ हजार ९२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे.
चिखलदरा तालुक्यात अपेक्षित सरासरी क्षेत्राच्या १०३ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. चांदूरबाजार तालुक्यात ८८ टक्के, अचलपूर ७२ टक्के, अंजनगाव ९५ टक्के, दर्यापूर १०८ टक्के, वरूड ९८ टक्के, मोर्शी ९५ टक्के, तिवसा ९७ टक्के, चांदूररेल्वे ९१ टक्के, नांदगाव खंडेश्वर ११० टक्के, भातकुली ९९ टक्के, अमरावती ९८ टक्के, चिखलदरा ७७ टक्के व धारणी तालुक्यात ८८ टक्के क्षेत्रात पेरणी झालेली आहे. जिल्ह्यात कपाशीचे सर्वाधिक ३० हजार ९५० हेक्टर क्षेत्र वरूड तालुक्यात आहे. शेतीमशागतीला वेग आला आहे.