सहा लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 01:20 AM2019-07-25T01:20:27+5:302019-07-25T01:20:54+5:30

जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्के पाऊस असताना ९१ टक्के क्षेत्रात खरिपाची पेरणी झाल्याची कृषी विभागाची माहिती आहे. पावसाच्या खंडामुळे किमान १० टक्के क्षेत्रात दुबार पेरणीचे संकट ओढावल्याचे या विभागाने सांगितले.

Sowing in an area of six lakh hectares | सहा लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी

सहा लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी

Next
ठळक मुद्देकृषी विभागाची माहिती : १० टक्के क्षेत्रात दुबार पेरणीला दुजोरा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्के पाऊस असताना ९१ टक्के क्षेत्रात खरिपाची पेरणी झाल्याची कृषी विभागाची माहिती आहे. पावसाच्या खंडामुळे किमान १० टक्के क्षेत्रात दुबार पेरणीचे संकट ओढावल्याचे या विभागाने सांगितले. आणखी दोन दिवस पावसाच्या स्थितीत सुधार नसल्याने दुबार पेरणीचे क्षेत्र वाढणार असल्याचे वास्तव आहे.
यंदा खरीप हंगामाचे सुरूवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी आहे. २४ जून रोजी मान्सून सुरू झाल्यानंतर आठ दिवसांचा खंड, २ जुलै रोजी पुनरागमन केल्यानंतर ४ पासून आतापर्यंत खंड आहे. दरम्यान केवळ दोन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. आता २५ जुलैनंतर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६० मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १८६ मिमी पाऊस पडला. ही ५१ टक्केवारी आहे. अपेक्षित सरासरीच्या निम्माही पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर अरिष्ट कोसळले आहे.
यंदाच्या खरिपात सात लाख २८ हजार ११२ हेक्टर क्षेत्र सरासरी क्षेत्र आहे. त्यातुलनेत ६ लाख ६८ हजार ८८६ हेक्टरमध्ये सद्यस्थितीत पेरणी झालेली आहे. ही ९१ टक्केवारी आहे. अद्यापही ६० हजार हेक्टर क्षेत्र नापेर आहे. खरीप हंगामाचे दोन महिने संपत आले आहे. २५ जुलैैनंतर सोयाबीनची पेरणी करू नये, अशी कृषी विद्यापीठाची शिफारस आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत धान ५,६०३ हेक्टर, ज्वारी १३,०६५, बाजरी १, मका ८६३२, तूर १,०६,४९५, मूग १२,४२३, उडीद ५६३४, सोयाबीन २,४३,१९२, भुईमूग ५५२, तीळ ७८, सूर्यफूल निरंक, कपाशी २,६६,११६ व हळदीचे ३५४ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे.

मान्सूनचा अक्ष त्याच्या स्थितीपासून दक्षिणेकडे सरकरण्याची शक्यता असल्याने मध्यभारतात २५ जुलैपासून पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. ३० जुलैपर्यंत मध्य भारतात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
- अनिल बंड, हवामानतज्ञ

विदर्भाचे नंदनवन पावसात माघारले
यंदाच्या खरिपात सद्यस्थितीत अपेक्षित सरासरीच्या निम्माच म्हणजेच ५१ टक्केच पाऊस आतापर्यंत झालेला आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ६६.५ टक्के, भातकुली ३४.३, नांदगाव खंडेश्वर ४४.२, चांदूर रेल्वे ६४.२, धामणगाव रेल्वे ५९.९, तिवसा ४१.९, मोर्शी ३९.९,वरूड ३२.४, अचलपूर ५८.४, चांदूरबाजार ५५.१, दर्यापूर ४२.२, अंजनगाव सुर्जी ४७.१, धारणी ७१.७ व विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा तालुक्यात ५७.७ टक्केच पाऊस झाला आहे, तर जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस वार्षिक सरासरीच्या २२.८ टक्के इतकाच आहे.

Web Title: Sowing in an area of six lakh hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती