१.७९ लाख हेक्टरवरील पेरण्यांचा पावसाअभावी खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:14 AM2021-07-07T04:14:25+5:302021-07-07T04:14:25+5:30

अमरावती : जिल्ह्यात १० दिवसांपासून पावसाची ओढ असल्याने जिल्ह्यात १,७८,५१५ हेक्टरमधील पेरण्या खोळंबल्या आहेत. सद्यस्थितीत ५,२०,२८१ हेक्टरमधील पेरणी आटोपली ...

Sowing due to lack of rain on 1.79 lakh hectares | १.७९ लाख हेक्टरवरील पेरण्यांचा पावसाअभावी खोळंबा

१.७९ लाख हेक्टरवरील पेरण्यांचा पावसाअभावी खोळंबा

Next

अमरावती : जिल्ह्यात १० दिवसांपासून पावसाची ओढ असल्याने जिल्ह्यात १,७८,५१५ हेक्टरमधील पेरण्या खोळंबल्या आहेत. सद्यस्थितीत ५,२०,२८१ हेक्टरमधील पेरणी आटोपली आहे. ही टक्केवारी ७४.४५ आहे. सोमवारपासून पुनर्वसु नक्षत्राला सुरुवात झाली आहे. या नक्षत्रामधील पावसाला ‘तरणा’चा पाऊस म्हणतात व वाहन उंदीर आहे. यावर आता शेतकऱ्यांची मदार आहे.

पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या असल्या तरी ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, त्या उलटण्याची भीती निर्माण झालेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१७ मिमी पाऊस झाला आहे. मात्र, नियमित व सार्वत्रिक पाऊस झालेला नाही. जून महिन्यात वेळेआधी १० जूनला मान्सूनचे आगमन झालेले असले तरी फक्त दोनच दिवस सार्वत्रिक पावसाची नोंद झाली. पाऊस हा विखुरलेल्या स्वरूपात झाला. त्यामुळे त्या भागातील पेरण्या झाल्या असल्या तरी पावसााभावी कोवळी पिके माना टाकत आहेत व किडी त्यांचा फडशा पाडत असल्याचे चित्र शिवारात आहे.

कृषी विभागाच्या सोमवारचे अहवालानुसार, जिल्ह्यात धानाचे ४१८१ हेक्टर, ज्वारी ७९६२ हेक्टर, मका ९०९४ हेक्टर, तूर ९१,३८९ हेक्टर, मूग ९८९५ हेक्टर, उडीद ३,३९१ हेक्टर, सोयाबीन २,०८,२०८ हेक्टर व भुईमुगाची ३३१ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे.

बॉक्स

तालुकानिहाय पेरणी झालेले क्षेत्र

सद्यस्थितीत धारणी ३१,५९३, चिखलदरा १२,११४, अमरावती ४५,७७४, भातकुली २९,९७९, नांदगाव खंडेश्वर ६१,१७३, चांदूर रेल्वे ३७,४८९, तिवसा ३५,८९३, मोर्शी ४३,०७३, वरूड ३७,८४७, दर्यापूर ४२,४५९, अंजनगाव ३७,३८२, अचलपूर २५,१५१, चांदूर बाजार ३०,१६९ व धामणगाव रेल्वे तालुक्यात ५०,७७३ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे.

Web Title: Sowing due to lack of rain on 1.79 lakh hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.