यंदा खरिपात सोयाबीन क्षेत्र जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:11 AM2021-05-30T04:11:42+5:302021-05-30T04:11:42+5:30
----------------------- शनिवारी दुपारी रोहिणीच्या सरी अमरावती : शनिवारी सकाळपासून कडाक्याचे उन्ह असताना दुपारी दीडच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाला. ...
-----------------------
शनिवारी दुपारी रोहिणीच्या सरी
अमरावती : शनिवारी सकाळपासून कडाक्याचे उन्ह असताना दुपारी दीडच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाला. १५ मिनिटांपर्यंत पाऊस झाला. परंतु वातावरणात उकाडा कायम आहे. आठ दिवसांपासून रोहिनी नक्षत्र सुरू झालेले आहे.
-----------------------
२ जूननंतर वाढणार पावसाचे प्रमाण
अमरावती : ईशान्य मध्यप्रदेश, विदर्भ, तेलंगणा, रायलसीमा तामिळनाडूवर असलेली द्रोणीय स्थिती आणि मध्य पूर्व अरबी समुद्रात असलेले चक्रीय वारे आणि अन्य अनुकूल हवामान शास्त्रीय परिस्थिती यांच्या प्रभावामुळे विदर्भात दोन जूनपर्यंत तुरळक ठिकाणी गडगडाटासह आणि वावटळीसह हलका व मध्यम पावसाची, वादळाची शक्यता आहे.
२ जूननंतर पावसाचे प्रमाण थोडे वाढण्याची शक्यता आहे. तसेच पेरणी योग्य पाऊस १५ जूननंतरच होण्याची शक्यता आहे. दोन दिवस कमाल तापमान वाढण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहील, केरळ किणारपट्टीवर मान्सूनचे आगमन ३१ मे रोजी होण्याची शक्यता असल्याचे हवामानतज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली.
-----------------------
अर्जुननगर भागात वीजपुरवठा खंडित
अमरावती : येथील अर्जुननगर भागात रोज वीजपुरवठ्यात खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. दिवसाचे प्रचंड तापमान असताना दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित होतो. याशिवाय थोडा जरी पाऊस आला तरी वीजपुरवठा बंद करण्यात येत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
-----------------------
संचारबंदीत शिथिलता मिळण्याची शक्यता
अमरावती : जिल्ह्यात चार दिवसांपासून कोरोना संसर्गात कमी आलेली आहे. याशिवाय पाॅझिटिव्हिटी देखील सहा ते आठ टक्क्यांच्या दरम्यान आहे. त्यामुळे संचारबंदीत काही प्रमाणात शिथिलता देण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहे. याविषयी शासनादेश अप्राप्त असल्याचे सांगण्यात आले.