यंदा २० हजार हेक्टरने घटणार सोयाबीन क्षेत्र

By admin | Published: May 10, 2017 12:16 AM2017-05-10T00:16:21+5:302017-05-10T00:16:21+5:30

यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षीपेक्षा किमान २० हजार हेक्टर क्षेत्र कमी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

Soybean area will be reduced by 20 thousand hectares this year | यंदा २० हजार हेक्टरने घटणार सोयाबीन क्षेत्र

यंदा २० हजार हेक्टरने घटणार सोयाबीन क्षेत्र

Next

खरीप हंगाम : हमीपेक्षा कमी भाव मिळत असल्याने फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षीपेक्षा किमान २० हजार हेक्टर क्षेत्र कमी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. मागील वर्षभऱ्यात सोयाबीनचे दर हमीभावाच्या आसपासच राहिले आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी व भावही नाही याचा थेट परिणाम सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रावर होणार आहे.
गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीनचे दोन लाख ९१ हजार २४७ हेक्टर पेरणी क्षेत्र होते. परंतु यंदा हे क्षेत्र दोन लाख ७० हजार हेक्टरपर्यंत राहणार असल्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली. हमीपेक्षा कमी भाव राहण्यामुळे तुरीच्या क्षेत्रातदेखील यंदा ५ ते १० हजार हेक्टरनी घट होणार आहे.
कृषी विकास अधिकाऱ्यांनी आयुक्तालयास पाठविलेल्या अहवालानुसार यंदा जिल्ह्यात सोयाबीनचे दोन लाख ७० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ३८ हजार, भातकुली २६ हजार, नांदगाव खंडेश्वर ४७ हजार, तिवसा २० हजार, चांदूररेल्वे २५ हजार, धामणगाव १६ हजार, मोर्शी १८ हजार, वरूड दोन हजार, चांदूरबाजार २० हजार, अचलपूर १२ हजार ५००, अंजनगाव सुर्जी १२ हजार ५००, दर्यापूर ११ हजार, धारणी १० हजार व चिखलदरा तालुक्यात १२ हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीनसाठी प्रस्तावित केले आहे.

१.२२ लाख क्विंटल बियाणे लागणार
यंदा प्रस्तावित सोयाबीन क्षेत्रासाठी किमान एक लाख २१ हजार ५०० क्विंटल बियाणे लागणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १२ हजार, भातकुली ११ हजार, नांदगाव १६ हजार, चांदूररेल्वे ११ हजार, तिवसा ९ हजार, धामणगाव ८ हजार ५००, मोर्शी ८ हजार ५००, वरूड ७ हजार, अंजनगाव सुर्जी ७ हजार ५००, अचलपूर ६ हजार, दर्यापूर ६ हजार, चांदूरबाजार ८ हजार ५००, धारणी ५ हजार ५०० व चिखलदरा तालुक्यात ५ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे.

Web Title: Soybean area will be reduced by 20 thousand hectares this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.