उत्पादन तोकडे तरीही सोयाबीन बेभाव

By admin | Published: November 19, 2014 10:31 PM2014-11-19T22:31:14+5:302014-11-19T22:31:14+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक सिमित असतानाही भाव मात्र अल्प मिळत आहे. शेतमाल तारण योजनेचाही लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळत नसल्यामुळे गरजेपोटी मिळेल

Soybean deficiency in yield still | उत्पादन तोकडे तरीही सोयाबीन बेभाव

उत्पादन तोकडे तरीही सोयाबीन बेभाव

Next

अमरावती : कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक सिमित असतानाही भाव मात्र अल्प मिळत आहे. शेतमाल तारण योजनेचाही लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळत नसल्यामुळे गरजेपोटी मिळेल त्या भावात शेतमाल विकावा लागत आहे. मार्केटिंग फेडरेशनमार्फत सुरू असलेली तारण योजना बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांवर ही नामुष्की ओढवली आहे.
यावर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना अखेरपर्यंत मारक ठरला. दीड महिना मान्सून उशिरा, दुबार, तिबार पेरणी, पीक ऐन फुलोऱ्यावर असताना पावसाची दडी यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. त्यामुळे उत्पादनात ६० टक्के घसरण आली. त्यातही विदर्भातील नगदी पीक असलेल्या सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असूनही त्यालाच भाव कमी असल्याने शेतकऱ्यांची वाताहत होत आहे. काहींनी तर सवंगणीचा खर्च पाहत पीक शेतातच मोडून टाकले. शेतकऱ्यांनी ही सगळी व्यवस्था उसनवारीने केली होती. आता सावकारांना काय द्यायचे, या विवंचनेत शेतकरी दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा आत्महत्येचे सत्र सुरू होऊ शकते.
आंतरराष्ट्रीय भाव कमी
सोयाबीनपासून तेल उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्याचप्रमाणे मळीपासून निर्माण होणारी ढेप देशाबाहेर निर्यात केली जाते. येथील ढेपीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मानाचे स्थान आहे. सोयाबीनचे विविध उपयोग आहे

Web Title: Soybean deficiency in yield still

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.