सोयाबीन उगवण तक्रारींची पुनरावृत्ती होऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:12 AM2021-04-25T04:12:04+5:302021-04-25T04:12:04+5:30

अमरावती : सोयाबीनच्या उगवणबाबत गत हंगामात मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसे पुन्हा घडू नये, यासाठी आवश्यक ...

Soybean germination complaints should not be repeated | सोयाबीन उगवण तक्रारींची पुनरावृत्ती होऊ नये

सोयाबीन उगवण तक्रारींची पुनरावृत्ती होऊ नये

Next

अमरावती : सोयाबीनच्या उगवणबाबत गत हंगामात मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसे पुन्हा घडू नये, यासाठी आवश्यक उपाययोजनांची भरीव अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी दिले.

खरीप हंगाम नियोजनाबाबत कृषी विभागाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यपालन अधिकारी अविश्यांत पंडा, कृषी सहसंचालक शंकर तोटावार, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चवाळे आदी उपस्थित होते.

खरिपासाठी गुणवत्तापूर्ण बियाण्याचा पुरेसा पुरवठा सर्वदूर झाला पाहिजे. त्याअनुषंगाने सर्वतोपरी प्रयत्न व्हावेत. गतवर्षी अवकाळी पावसाने नुकसान झाले. त्यात बियाण्याची गुणवत्ता कमी झाल्याने पुन्हा पेरणीची वेळ आली. हे पुन्हा घडू नये, यासाठी आताच उपाय राबवावेत. बियाण्याची कमतरता भासू नये. बियाण्याची साठेबाजी होता कामा नये. असा प्रकार कुठेही झाल्याचे आढळल्यास कुणाचीही गय करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

बॉक्स

खरिपासाठी सोयाबीन पिकाखाली २.७० लाख प्रस्तावित असून, २.१५ लाख क्विंटल बियाण्याची गरज आहे. त्यानुसार महाबीजकडे ८५ हजार क्विंटल व खासगी कंपन्यांकडे ४५,३१६ क्विंटल मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना घरचे बियाणे जतन करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार ९२,८०५ क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले.

बॉक्स

ही खबरदारी आवश्यक

शेतकऱ्यांनीही उगवणक्षमता तपासून ती ७० टक्के असल्याची खात्री करून पेरणी करावी. घरचे सोयाबीन बियाणेही तपासूनच पेरावे. सोयाबीन बियाणे पेरताना चार सेंटिमीटरपेक्षा जास्त खोलीवर पेरू नये. ट्रॅक्टरने पेरायचे झाल्यास अनुभवी ड्रायव्हरकडून पेरणी करावी. बियाणे बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरू नये. बीजप्रक्रियेसाठी बुरशीनाशक किंवा जीवाणू संघ वापरावा आदी सूचना कृषी विभागाने केल्या आहेत.

Web Title: Soybean germination complaints should not be repeated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.