सोयाबीन आले काढणीला, पावसाचा धोका पिकाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:13 AM2021-09-26T04:13:33+5:302021-09-26T04:13:33+5:30

फोटो - ओ २५ राजुरा (दोन कॉलम घेणे) फोटो कॅप्शन - ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनची गंजी वाळवण्याऐवजी शेतकरी बांधून ठेवत ...

Soybean ginger harvest, risk of rain crop | सोयाबीन आले काढणीला, पावसाचा धोका पिकाला

सोयाबीन आले काढणीला, पावसाचा धोका पिकाला

Next

फोटो - ओ २५ राजुरा (दोन कॉलम घेणे)

फोटो कॅप्शन - ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनची गंजी वाळवण्याऐवजी शेतकरी बांधून ठेवत आहेत. (छाया - सतीश बहुरूपी, राजुरा बाजार)

काढलेल्या सोयाबीनला कोंब फुटण्याची शक्यता, काही ठिकाणी सोंगणीलाही प्रारंभ झालेला नाही

अमरावती : जिल्हाभरात कुठे मुसळधार, तर कुठे रिमझिम पाऊस सातत्याने कोसळत आहे. ऑक्टोबर जवळ येत असतानाही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. आता तर विजांच्या कडकडाटासह तो कोसळत आहे. त्यामुळे कापणीला आलेले सोयाबीन काढायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.

१० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याने हर्षभरित झालेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन काढणीची प्रतीक्षा लागली होती. शेंगाचे दाणे भरून हे पीक काढणीला आलेले असताना आता कापणी करून घेतल्यास हे पीक पावसाच्या माराने कुजणार किंवा शेतात तसेच उभे ठेवल्यास दाण्यांना कोंब फुटतील, अशी कुचंबणा शेतकऱ्यांपुढे आहे. या कालावधीत १० हजारांवर गेलेले दर चार हजारांवर स्थिरावले आहेत.

दरम्यान, रविवारी जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचलपूर तालुक्यात शुक्रवारी दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचलपूर नगरपालिका क्षेत्रातही धो-धो पाऊस कोसळला. मल्हारा, गौरखेडा धोतरखेडा, पथरोट, जवलापूर, भिलोनासह तालुक्यातील अन्य ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेकांचे. सोयाबीन भिजले. सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे कपाशीची बोंड सडायला सुरुवात झाली आहे. संत्रा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. दर्यापूर तालुक्यात गुरुवारी व शुक्रवारीदेखील सुमारे दोन तास पाऊस कोसळला. याशिवाय तिवस्यात अर्धा तास, अचलपूर तालुक्यात दीड तास, अंजनगाव सुर्जी तालुक्यात तासभर पाऊस कोसळला. वरूड तालुक्यात राजुरा बाजारसह परिसरात अचानक काळेकुट्ट ढग दाटून १०-१५ मिनिटे जोरदार सरी कोसळल्या. धामणगाव रेल्वे तालुक्यात विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाने हजेरी लावली. तळेगाव दशासर, कावली वसाड व अंजनसिंगी परिसरातही पाऊस कोसळला. चांदूर बाजार तालुक्यातही अर्धा तास पाऊस झाला. चांदूर रेल्वे तालुक्यात ढगाळ वातावरण होेते. मुसळधार पाऊस कोसळेल, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, तुरळक सरी कोसळून पाऊस बंद झाला. धारणी तालुक्यातही पावसाचे वातावरण कायम आहे. सोयाबीन सवंगणीची कामे सुरू असताना पाऊस व्यत्यय आणत आहे. शेतजमीन ओली झाल्याने मजुरांना सवंगणी अर्ध्यावर टाकून परतावे लागत आहे. त्यासोबतच उघड्यावर टाकलेल्या सोयाबीनच्या गंजी गोळा करून ती झाकण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

Web Title: Soybean ginger harvest, risk of rain crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.