शेतकऱ्यांनो! सोयाबीन उशिरा विका, पाशा पटेल यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 07:36 PM2018-11-04T19:36:23+5:302018-11-04T19:39:53+5:30
येत्या काही दिवसांत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बदलाचा मोठा परिणाम शेतमालावर जाणवणार आहे. परिणामी मालाला अधिक भाव मिळणार आहे. त्यामुळे विदर्भातील शेतक-यांनी सोयाबीन उशिरा विकावे, असे आवाहन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी अमरावतीत रविवारी केले.
अमरावती : येत्या काही दिवसांत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बदलाचा मोठा परिणाम शेतमालावर जाणवणार आहे. परिणामी मालाला अधिक भाव मिळणार आहे. त्यामुळे विदर्भातील शेतक-यांनी सोयाबीन उशिरा विकावे, असे आवाहन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी अमरावतीत रविवारी केले. ते कृषी विषयक बाबींचा आढावा घेण्यासाठी आले असता, पत्रपरिषदेत सरकारच्या कृषी धोरणावर बोलत होते.
पाशा पटेल, यांच्या माहितीनुसार, राज्यात एक कोटी ४९ लाख हेक्टरवर खरिपाचे पीक घेतले जाते. यात सोयाबीन, कपाशी ६५ ते ७० टक्के पेरा केलाजातो. मध्यंतरी आंतरराष्ट्रीय धोरणाच्या परिणामामुळे सोयाबीन तेल, सोयबीन ‘डी आय केक’चे भाव गडगडले. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकºयांना फटका बसला. सोयाबीनला खुल्या बाजारात भाव मिळाले नाही. मात्र, ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने सोयाबीन निर्यात धोरणात आमूलाग्र बदल केले आहे. चीन, अमेरिका, बांगलादेश, इराणला सोयाबीन निर्यातचा करार झाला आहे. पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये चीन येथील एक शिष्टमंडळ भारतात येणार आहे. ते देशातील सोयाबीन आॅईल केंद्राची पाहणी करतील. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर हे तेलावर नव्हे, तर पेंडावर ठरतात. त्यामुळे सरकारने अर्जेटिंना, अमेरिका, चीन यांच्यासोबत झालेल्या संयुक्त करारानुसार क्रूड आॅईल ड्युटीचे दर समान केले आहे. परिणामी येत्या काळात सोयाबीनला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात मागणी असेल. शेतकºयांनी सोयाबीन विकण्याची घाई करू नये. शासनाने पणनच्या माध्यमातून तारण योजना सुरू केली आहे. सोयाबीन तारण ठेवताना शेतकºयांना ७० टक्के रक्कम सहा टक्के व्याज दराने घेता येईल. खुल्या बाजारात सोयाबीन विकण्याची घाई न करता तेजी, मंदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाशा पटेल यांनी केले. मूग, उडिदाची नोंदणी करण्याचा सूचना प्रशासनाला दिल्याचेसुद्धा पटेल यांनी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष जयंत डेहनकर, माजी महापौर किरण महल्ले, अनिल आसलकर, सतीश करेसिया, मनोहर सुने आदी उपस्थित होते.
बांगलादेशात पाठविणार २०० रेल्वे रॅक
सोयाबीन डी आॅईल केकच्या २०० रेल्वे रॅक बांगलादेशात पाठविल्या जाणार आहे. इराणनेदेखील मागणी केली आहे. त्यामुळे येत्या काळात सोयाबीनला सुगीचे दिवस येणार आहे. सोयाबीनसाठी जागतिक परिस्थिती तयार झाल्याची माहिती पाशा पटेल यांनी दिली. सोयाबीन डी आॅईल केकच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादकांना लाभ मिळणार आहे.