नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सोयाबीन पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 10:54 PM2019-10-29T22:54:31+5:302019-10-29T22:54:56+5:30

काही शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतात कापणी करून पडले आहे, तर काहींनी मळणी यंत्रावरून काढून आणलेले ओले सोयाबीन घरात टाकले आहे. पण, सततच्या पावसाने ढगाळ वातावरणाने ते उन्हात सुकवणे कठीण झाले असून, गल्लीबोळात, घरोघरी घामेजलेल्या सोयाबीनचा दर्प सुटला आहे. त्या वासाने शेतकरी कुटुंबांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

In soybean water in Nandgaon Khandeshwar taluka | नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सोयाबीन पाण्यात

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सोयाबीन पाण्यात

Next
ठळक मुद्देअतोनात नुकसान : वीरेंद्र जगताप यांनी शिवारात केली पाहणी, शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले. कापणी केलेले सोयाबीन पावसात भिजले. सोयाबीनच्या गंजीतही पाणी शिरल्याने पीक अत्यंत खराब झाले. परिणामी सोयाबीनउत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याअनुषंगाने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी मंगळवारी तालुक्यात विविध शिवारांना भेटी देऊन सोयाबीनच्या नुकसानाची पाहणी केली.
काही शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतात कापणी करून पडले आहे, तर काहींनी मळणी यंत्रावरून काढून आणलेले ओले सोयाबीन घरात टाकले आहे. पण, सततच्या पावसाने ढगाळ वातावरणाने ते उन्हात सुकवणे कठीण झाले असून, गल्लीबोळात, घरोघरी घामेजलेल्या सोयाबीनचा दर्प सुटला आहे. त्या वासाने शेतकरी कुटुंबांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी शिवणी रसुलापूर येथे शिवाराला भेट देऊन नुकसानाची पाहणी केली व. शेतकऱ्यांनी मळणी यंत्रवरून काढून आणलेल्या कुजलेल्या सोयाबीनची घरोघरी जाऊन पाहणी करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शिवणी रसुलापूर येथे प्रवीण गावंडे व प्रवीण राजूरकर यांच्या शेतात पाहणी करताना वीरेंद्र जगताप यांच्यासोबत शिवणी येथील शेतकरी केशवराव तांदूळकर, रघुपती गावंडे, किशोर गौरखेडे गजानन राजकुळे, गणेश वंजारी, मोरेश्वर वंजारी, नितीन तरेकर, रंजित गावंडे, सुखदेव शेलोकार, प्रशांत देशमुख, नितीन कडू, मंगेश गावंडे, मारुती वंजारी, गणेश वंजारी, अमोल राजकुडे, नितीन तरेकर, विजय चिंचे, रमेश खडसे, राजू सगळे, दादाराव दादरवाडे, अमोल जवळकर, नांदगावचे अक्षय पारस्कर, अमोल धवसे, फिरोज खान, निशांत जाधव, अशोक दैत, प्रदीप ब्राह्मणवाडे, सतीश पोफळे आदी उपस्थित होते.

तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पीक अतिपावसाने खराब झाले आहे. विमा कंपन्यांचे प्रतिनिधी गावातून बेपत्ता आहेत. गावागावांत कुजलेल्या सोयाबीनमुळे अनारोग्यात भर पडली आहे. शासनाने तातडीने सर्वेक्षण करून हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्यावी.
- वीरेंद्र जगताप, माजी आमदार

Web Title: In soybean water in Nandgaon Khandeshwar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.