तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सभापतींनी खडसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 10:53 PM2019-01-19T22:53:35+5:302019-01-19T22:53:58+5:30

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारितील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र्रातील कामकाजाची अनावस्था व पदाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या जिल्ह्यातील १४ तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना शुक्रवारी सभेदरम्यान आरोग्य सभापती बळवंत वानखडे यांनी खडसावले. सभापतींचा संताप पाहून सभेला उपस्थित अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती.

Speaker of the Taluka health complex raked up | तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सभापतींनी खडसावले

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सभापतींनी खडसावले

Next
ठळक मुद्देआरोग्य समितीत संताप : जिल्हा परिषदेत कामचुकारांची खरडपट्टी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारितील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र्रातील कामकाजाची अनावस्था व पदाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या जिल्ह्यातील १४ तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना शुक्रवारी सभेदरम्यान आरोग्य सभापती बळवंत वानखडे यांनी खडसावले. सभापतींचा संताप पाहून सभेला उपस्थित अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती.
जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा १९ जानेवारी रोजी सभापतींच्या दालनात घेण्यात आली. ग्रामीण भागातील ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे आरोग्य केंद्र आयएसओ करण्याच्या दृष्टीने तालुका वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या तालुक्यातील एक प्राथमिक आरोग्य केंद्र आयएसओ करण्याच्या दृष्ट्रीने नियोजनबद्ध कामे करण्याचे सभापती बळवंत वानखडे यांनी सूचित केले होते. मात्र आरोग्य सभापतींनी जिल्हा आरोग्य अधिकाºयांनमार्फत दिलेल्या लेखी पत्राचे अनुषंगाने १४ ही तालुका वैद्यकीय अधिकाºयांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे सभापतींनी सर्व तालुका वैद्यकीय अधिकाºयांना खडेबोल सुनाणावत जाब विचारला. यासोबतच सभेत ग्रामीण भागात रक्तदान शिबिर, आरोग्य केंद्रातील आवश्यक सोई सुविधा व त्यावर उपाययोजनेसाठी सूचना दिली होती. मात्र कार्यवाही झाली नाही. गोवर, रूबेला लसीकरणाचे उद्दिष्टही साध्य केले नाही. त्यामुळे आरोग्य समितीत या विषयावर टीएमओंना कधी नव्हे खडेबोल सुनावले. आरोग्य सभापती व समितीच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याने जिल्हा परिषद आरोग्य समिती सदस्यांनीही जिल्हा आरोग्य अधिकाºयांकडे नाराजी व्यक्त करीत कामकाजात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. यावेळी बोगस डॉक्टरांवर कारवाई होत नसल्याचा मुद्दा, प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्वच्छता, सोई सुविधा व अन्य विषयावरही सभेत वादळी चर्चा झाली. कामकाजात तातडीने सुधारणा करा अन्यथा जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना अचानक दिलेल्या भेटी सुधारणा न दिल्यास दोषीवर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
यावेळी सभेला सभापती बळवंत वानखडे, सदस्य सुखदेव पवार, गणेश सोळंके, सीमा घाडगे व जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले, मनीषा सूर्यवंशी व अन्य आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
चिंचोना येथील मुद्दा गाजला
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोना येथे किडनी आजाराने अनेक नागरिक आजारी पडलेत. तेथील नागरिकांना आरोग्याच्या पुरेशा सोई व आजार मुक्तीसाठी आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देणे अपेक्षित होते. मात्र, यात आरोग्य विभागाने अपेक्षित अशा उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे चिंचोना गावातील किडनी आजाराने त्रस्त रूग्णांना तातडीने आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश आरोग्य समितीने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Web Title: Speaker of the Taluka health complex raked up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.