लसीकरण जनजागृतीसाठी सभापती, बीडीओ आदिवासींच्या दारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:12 AM2021-05-14T04:12:35+5:302021-05-14T04:12:35+5:30
फोटो पी १३ पथक चिखलदरा : कोरोनामुळे जगभर हाहाकार माजला असताना मेळघाटातील आदिवासी लसीकरणाला नकार देत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ...
फोटो पी १३ पथक
चिखलदरा : कोरोनामुळे जगभर हाहाकार माजला असताना मेळघाटातील आदिवासी लसीकरणाला नकार देत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. आदिवासी लसीकरणासाठी पुढे येत नसल्यामुळे प्रशासन हतबल झाल्याचे चित्र होते. प्रशासन आता पाड्यांमध्ये घरोघरी जाऊन लसीकरणाचे महत्त्व सांगत आहे. त्याचे परिणामही चांगले मिळू लागले आहे. बहाद्दरपूर येथे खुद्द पंचायत समिती सभापती बीडिओ यांनी सरपंच सदस्यांना घेऊन बुधवारी लसीकरणात आदिवासींना सहभागी करून घेतले.
टेंब्रूसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या बहाद्दरपूर येथे बुधवारी कोरोना लसीकरण ठेवण्यात आले होते. आदिवासींचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा, यासाठी चिखलदरा पंचायत समितीचे सभापती बन्सी जामकर, बीडीओ प्रकाश पोळ यांच्यासह माजी सरपंच प्रकाश जामकर, पोलीस पाटील रंजना कोडापे, ग्रामपंचायत सदस्य दीपा कोडापे, रामलाल शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोतीलाल धीकार, वैद्यकीय अधिकारी पिंपरकर, आरोग्य कर्मचारी घोम, कावरे, रेखा वाहुरवाघ, ललिता वरघट, सेविका कल्पना घाटोळ, आशा फुलवंती कास्देकर, रामकिसन सावलकर, दिनेश जामनिक, सोनालाल कास्देकर आदींना सोबत घेण्यात आले होते. जवळपास ९० टक्के लसीकरण येथे झाले.
बॉक्स
जनजागृतीमुळे चांगला प्रतिसाद
लसीकरणाबाबत आदिवासींमध्ये काहींनी गैरसमज पसरविला होता. मात्र, त्यानंतर महसूल, आरोग्य व पंचायत समितीसह इतर विभागांतील अधिकारी - कर्मचारी, पदाधिकाऱ्यांनी लसीकरणाला नकार देणाऱ्या गावागावांत जाऊन जनजागृती केल्यामुळे आता चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती तहसीलदार माया माने यांनी ‘लोकमत’ला दिली.