महापालिकेची विद्यार्थ्यांसाठी ‘खास’ बससेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 10:40 PM2017-09-05T22:40:16+5:302017-09-05T22:40:35+5:30

महानगरपालिकेच्या ‘आमची परिवहन’मधील ‘विद्यार्थी शहर बससेवे’चा शुभारंभ मंगळवार ५ सप्टेंबरपासून करण्यात आला.

'Special' bus service for the students of NMC | महापालिकेची विद्यार्थ्यांसाठी ‘खास’ बससेवा

महापालिकेची विद्यार्थ्यांसाठी ‘खास’ बससेवा

Next
ठळक मुद्देमहापौरांनी दिली हिरवी झेंडी : शिक्षक दिनाची भेट, बडनेरा ते नवसारी दुहेरी बसफेरीचा शुभारंभ, विद्यार्थ्यांची सोेय

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महानगरपालिकेच्या ‘आमची परिवहन’मधील ‘विद्यार्थी शहर बससेवे’चा शुभारंभ मंगळवार ५ सप्टेंबरपासून करण्यात आला. विद्यार्थी शहर बसचे लोकार्पण महापौर संजय नरवणे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेजवळून हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
खास विद्यार्थ्यांकरिता ही शहर बससेवा सुरू करण्यात आली आहे. बडनेरा ते नवसारी अशी दुहेरी बसफेरी असून ती सकाळी १० वाजता व सायंकाळी ५ वाजता सुटणार आहे. स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्या पुढाकाराने सुरू झालेली ही बससेवा विद्यार्थांना लाभदायक ठरेल. स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी यावेळी सांगितले की, महापालिकेतर्फे महिलांसाठी याआधी सीटी बससेवा सुरू करण्यात आली होती. आता शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करण्यात येत आहे. शिक्षकदिनी अमरावती महानगरपालिकेतर्फे ही विद्यार्थ्यांना भेट देण्यात आली आहे. यावेळी बोलताना महापौर नरवणे म्हणाले, सकाळी कार्यालयीन वेळेतच विद्यार्थ्यांची शाळा असल्याने शहर बसमध्ये प्रचंड गर्दी असते. सिटी बसमध्ये चढणे विद्यार्थ्यांना कठीण होते. त्यामुळे सकाळी १० वाजता बडनेरा येथून नवसारीकडे आणि याच वेळेत नवसारी येथून बडनेराकडे शहर बस सोडण्यात येणार असून त्यानंतर सायंकाळी शाळा सुटल्यावर म्हणजेच ५ वाजता बसेस सोडण्यात येणार आहेत. या सीटीबसचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपमहापौर संध्या टिकले, आयुक्त हेमंत पवार, पक्षनेता सुनील काळे, शिक्षण समिती सभापती चेतन गावंडे, शहर सुधार समिती सभापती शिरीश रासने उपस्थित होते.

Web Title: 'Special' bus service for the students of NMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.