अपंगांच्या लसीकरणासाठी दर शनिवारी विशेष शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:10 AM2021-06-04T04:10:38+5:302021-06-04T04:10:38+5:30

अमरावती : कोविड प्रतिबंधक लसीकरणात ज्येष्ठ व्यक्ती व अपंगांच्या लसीकरणास प्राधान्य देण्यात येत आहे. त्याचबरोबर, दर शनिवारी अपंगांच्या लसीकरणासाठी ...

Special camp for the disabled every Saturday | अपंगांच्या लसीकरणासाठी दर शनिवारी विशेष शिबिर

अपंगांच्या लसीकरणासाठी दर शनिवारी विशेष शिबिर

Next

अमरावती : कोविड प्रतिबंधक लसीकरणात ज्येष्ठ व्यक्ती व अपंगांच्या लसीकरणास प्राधान्य देण्यात येत आहे. त्याचबरोबर, दर शनिवारी अपंगांच्या लसीकरणासाठी विशेष शिबिरांचेही आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी दिले.

जिल्हाधिकारी नवाल यांनी जिल्ह्यातील लसीकरणाचा आढावा गुरुवारी ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला, त्याचबरोबर अनाथ बालक संगोपन जिल्हा कृती दलाची (टास्क फोर्स) ऑनलाईन बैठकही त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अतुल भडांगे यांच्यासह बाल संगोपन कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.

ठिकठिकाणी नियमितपणे होणाऱ्या लसीकरणात वृद्धजन, दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणास प्राधान्य दिले जात आहे. त्याचबरोबर, अपंगांसाठीच्या शाळा, वसतिगृहे, पुनर्वसन केंद्रे, निवासी संस्था आदी ठिकाणी दर शनिवारी विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात यावे. लसीकरण केंद्रांवर टोकन सिस्टीम सुरू केल्यामुळे नागरिकांची गर्दी टळून त्यांच्या वेळेचीही बचत होत आहे. लसीकरण कार्यक्रमाला गती देण्यासाठी शिबिर मोडवर काम करणे आवश्यक आहे. त्यानुसार गॅस एजन्सी कर्मचारी, बँक कर्मचारी अशा विविध क्षेत्रांसाठी शिबिरांचे नियोजन करावे. कोरोना प्रतिबंधासाठी आघाडीवर कार्यरत आशा सेविका, आरोग्यसेविकांना मास्क आदी सामग्री नियमितपणे उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

बॉक्स

अनाथ बालकांची माहिती वेळीच कळवा

कोरोनामुळे अनाथ बालकांची माहिती वेळीच कळणे आवश्यक आहे. त्यामुळे उपचारासाठी दाखल बाधिताचे दुर्देवाने निधन झाल्यास त्याच्यावरील अवलंबितांची माहिती वेळीच डेथ फॉर्ममध्ये भरून घ्यावी. तशी प्रक्रिया रुग्णालयांनी वेळीच पार पाडून संबंधित बालकांबाबत टास्क फोर्सला तत्काळ कळवावे जेणेकरून संगोपनाबाबत पुढील प्रक्रिया गतीने होईल. यासाठी सर्व रुग्णालयांना स्पष्ट सूचना देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

Web Title: Special camp for the disabled every Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.