मतदार यादीत सुधारणांसाठी विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:09 AM2021-06-11T04:09:54+5:302021-06-11T04:09:54+5:30

अमरावती : मतदार यादीतील छायाचित्र अद्यापही ‘अपडेट’ नसलेल्या मतदारांनी ते १५ जूनपूर्वी जमा करावे. सचित्र मतदार यादी अद्ययावत करण्याचे ...

Special campaign for voter list reforms | मतदार यादीत सुधारणांसाठी विशेष मोहीम

मतदार यादीत सुधारणांसाठी विशेष मोहीम

googlenewsNext

अमरावती : मतदार यादीतील छायाचित्र अद्यापही ‘अपडेट’ नसलेल्या मतदारांनी ते १५ जूनपूर्वी जमा करावे. सचित्र मतदार यादी अद्ययावत करण्याचे राष्ट्रीय कार्य सुरू असल्यामुळे संबंधित मतदारांनी जिल्हा निवडणूक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.

जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट, अचलपूर व मोर्शी विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या अद्ययावत होत आहेत. त्यासाठी मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांकडून छायाचित्रे मिळवून ते यादीत अद्ययावत करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरभेटीही देतात. मात्र, अनेकदा मतदार यादीत नमूद पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून आले आहे. अशा मतदारांची नावे लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० व मतदार नोंदणी अधिनियम, १९६० मधील तरतूद व भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वगळण्यात येणार आहेत.

बॉक्स

यादी ‘वेबसाईट’ला उपलब्ध आहे

मतदार यादीत ज्या मतदारांची छायाचित्रे समाविष्ट नसतील (नो फोटो व्होटर्स), अशा मतदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी १५ जूनपूर्वी आपली छायाचित्रे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा संबंधित तहसील कार्यालय किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार यांनी केले आहे.

Web Title: Special campaign for voter list reforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.