स्पेशल स्कॉड ऑन फायर, तीन कारवाईत पकडली ३.११ कोटी रुपये कॅश

By प्रदीप भाकरे | Published: November 14, 2024 07:00 PM2024-11-14T19:00:07+5:302024-11-14T19:00:55+5:30

अमरावती विधानसभा क्षेत्रात ‘ट्रॅप’ : कसून चौकशी, वैधतेनंतर परतही केली

Special squad on fire, seized Rs 3.11 crore cash in three operations | स्पेशल स्कॉड ऑन फायर, तीन कारवाईत पकडली ३.११ कोटी रुपये कॅश

Special squad on fire, seized Rs 3.11 crore cash in three operations

अमरावती : पोलिस आयुक्तांनी नव्याने गठित केलेल्या स्पेशल स्कॉडने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर कारवायांचा धडाका लावला आहे. या पथकाने गुरूवारी दुपारी सलग तीन कारवाया करत ३.११ कोटी रुपये रोख रक्कम पकडली. पोलिस यंत्रणा व अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आचारसंहिता कक्षाच्या नोडल अधिकाऱ्यांनी वैधता तपासल्यानंतर ती रोख रक्कम संबंधित कंपनी वा बॅंकेला परत करण्यात आली. तीनही कारवायांमधील रकमेची चारचाकी वाहनातून वाहतूक होत होती. रेकार्डपेक्षा अधिक रकमेची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून ती झाडाझडती घेण्यात आली.
           

स्पेशल स्कॉडचे प्रमुख तथा पोलिस निरिक्षक आसाराम चोरमले हे आपल्या पथकासह पेट्रोलिंग करत असताना साबणपुरा भागातून त्यांनी इंडिया नंबर वन या एटीएम कंपनीची कॅश वाहून नेणारे वाहन थांबविले. त्यात १७ लाख रुपये रोख रक्कम आढळून आली. तर, श्याम चौकातून एसबीआयचे वाहन थांबवून त्याची तपासणी करण्यात आली. त्यात २.४४ कोटी रुपये रोख रक्कम आढळून आली. ती रक्कम अमरावती व बडनेरा शहरात जात होती. तर तिसरी कारवाई चौधरी चौकात करण्यात आली. त्या वाहनात कॉसमॉस बॅंकेची ५० लाख रुपये रोख आढळून आली. ती रक्कम कॉसमॉस बॅंकेच्या मुख्य शाखेतून त्याच बॅंकेच्या अन्य शाखेत जात होती. तीनही वाहने कोतवालीत पोलिस ठाण्यात आणत त्यातील रोख रक्कम मोजण्यात आली. त्याबाबत अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी अमित डेंगरे यांना कळविण्यात आले. पीआय चोरमले व डेंगरे यांनी संबंधित बॅक, एटीएम कंपनी व संबंधितांकडून प्राप्त दस्तावेजांची कसून चौकशी केली. ती रक्कम त्यांचीच असल्याची खात्री झाल्याने ती परत करण्यात आली.

शेगाव नाका चौकातही कारवाई

चौथी कारवाई अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आचारसंहिता कक्षाचे पथक व गाडगेनगर पोलिसांनी गुरूवारी दुपारी शेगाव नाका चौकात संयुक्तरित्या केली. तेथून एका वाहनातून जाणारे ३२ लाख रुपये जप्त करण्यात आले. त्यातील १९ लाख रुपये रोख ही बॅकेची तर उर्वरित रक्कम ही डी मार्टची असल्याचे आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी अमित डेंगरे यांनी ‘लोकमत’ ला दिली. हिताची नामक कॅश व्हॅनमधून त्या रकमेची वाहतूक होत होती. वैधता तपासल्यानंतर देखील ती परत करण्यात आली.

Web Title: Special squad on fire, seized Rs 3.11 crore cash in three operations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.