धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मुंबई ते पुणे आणि नागपूर विशेष गाड्या; मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय
By गणेश वासनिक | Published: October 6, 2024 02:33 PM2024-10-06T14:33:43+5:302024-10-06T14:34:46+5:30
नागपूर-भुसावळ-नाशिक रोडदरम्यानही विशेष गाड्या चालवणार...
अमरावती : दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबई मध्य रेल्वे प्रशासनाकडून धम्मचक्र प्रवर्तन दिवस- २०२४ निमित्ताने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता ११ ऑक्टोंबर पासून मुंबई ते पुणे आणि मुंबई ते नागपूर आणि नागपूर -भुसावळ - नाशिक रोड दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जाणार आहे. त्यामुळे नागपूर येथे दीक्षाभूमी येथे ये-जा करण्यासाठी बौद्ध बांधव, आंबेडकरी अनुयायांनी या विशेष गाड्यांनी प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
यात लोकमान्य टिळक टर्मिनस - नागपूर अनारक्षित विशेष (०१०१७) ही गाडी मुंबई येथून रात्री २ वाजता सुटेल. नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ५ वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सिंदी आणि अजनी येथे थांबे असणार आहे. नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (०१०१८) ही गाडी १३ ऑक्टोंबर रोजी नागपूर येथून रात्री वाजून २० मिनीटांनी सुटेल.
एलटीटी मुंबई येथे त्याच दिवशी ७ वाजता पोहोचेल.
नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (०१२१८) ही गाडी १२ ऑक्टोंबर रोजी रात्री १० वाजून ५ मिनीटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी एलटीटी मुंबई येथे २ वाजून ३५ मिनीटांनी पोहोचल. सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे येथे थांबे असणार आहे.
नागपूर-पुणे अनारक्षित विशेष (०१२१५) ही गाडी नागपूर येथून २३ वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी २० वाजता पोहोचेल. या गाडीला १८ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन असे डबे असतील.
पुणे-नागपूर अतिजलद विशेष (०१२१६) ही विशेष पुणे येथून ११ ऑक्टोंबर रोजी १६ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.४५ वाजता पोहोचेल. अजनी, सिंदी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा,
मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाइन असे थांबे असतील.
भुसावळ-नागपूर- नाशिक रोड मेमू विशेष
०१२१३ मेमू विशेष १२ ऑक्टोंबर रोजी भुसावळ येथून ०४.२५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १२ वाजता पोहोचेल.
०१२१४ मेमू विशेष १२ ऑक्टोंबर रोजी नागपूर येथून २३.४० वाजता सुटेल आणि नाशिकरोड येथे दुसऱ्या दिवशी १४.१० वाजता पोहोचेल. या मेमू ट्रेनला एक्सप्रेस स्थानकाचे थांबे असणार आहे.