पंढरपूरसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 10:21 PM2019-06-30T22:21:02+5:302019-06-30T22:21:16+5:30

एकादशीनिमित्त पंढरपूर येथे भरणाऱ्या यात्रेत विठ्ठलभक्तांना सहभागी होण्यास सोईचे जावे, याकरिता मध्य रेल्वे विभागाने अमरावती व नागपूर येथून विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर येथून १० जुलै, तर अमरावती (नवीन अमरावती रेल्वे स्थानक) येथून ६ जुलै रोजी दुपारी २ वाजता सुटणार आहे. १३ जुलै रोजी पंढरपूरहून नागपूरकडे रवाना होईल.

Special trains for Pandharpur | पंढरपूरसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

पंढरपूरसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर, अमरावतीहून धावणार : विठ्ठलभक्तांसाठी सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एकादशीनिमित्त पंढरपूर येथे भरणाऱ्या यात्रेत विठ्ठलभक्तांना सहभागी होण्यास सोईचे जावे, याकरिता मध्य रेल्वे विभागाने अमरावती व नागपूर येथून विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर येथून १० जुलै, तर अमरावती (नवीन अमरावती रेल्वे स्थानक) येथून ६ जुलै रोजी दुपारी २ वाजता सुटणार आहे. १३ जुलै रोजी पंढरपूरहून नागपूरकडे रवाना होईल.
यंदा आषाढी एकादशी १२ जुलै रोजी आहे. त्याअनुषंगाने रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ०१२०६ नागपूर - पंढरपूर विशेष गाडी नागपूरहून १० जुलै रोजी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुटणार आहे. दुसºया दिवशी गुरुवारी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी पंढरपूर येथे पोहचेल. नागपूर आणि अमरावती येथून पंढरपूरसाठी सुटणाºया गाड्यांचे एक्स्प्रेस थांबे आहे. ही विशेष गाडी असली तरी विठ्ठलभक्तांना तिकीट घेऊनच प्रवास करावा लागणार आहे. अन्यथा विनातिकीट प्रवास करताना आढळल्यास दंडात्मक कार्यवाही केली जाईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागपूर, अजनी, वर्धा, पूलगाव, धामणगाव, चांदूर रेल्वे, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौड, कर्डुवाडी असे थांबे असणार आहे. या गाडीला एकूण १८ डबे असून दोन थर्ड एसी, १२ स्लिपर, दोन सेकंड क्लास, दोन एसएलआर कोच राहतील.

Web Title: Special trains for Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.