सट्टा बाजारही संभ्रमात, भाव ठरेना

By admin | Published: October 16, 2014 11:18 PM2014-10-16T23:18:19+5:302014-10-16T23:18:19+5:30

बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सट्टाबाजारात उमेदवारांच्या विजयाचे भाग्य उघडतील, अशी अपेक्षा होती. मात्र झालेल्या मतदानानंतरची स्थिती अतिशय गोंधळाची झाल्याने सट्टा

Speculative market confusion | सट्टा बाजारही संभ्रमात, भाव ठरेना

सट्टा बाजारही संभ्रमात, भाव ठरेना

Next

अमरावती : बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सट्टाबाजारात उमेदवारांच्या विजयाचे भाग्य उघडतील, अशी अपेक्षा होती. मात्र झालेल्या मतदानानंतरची स्थिती अतिशय गोंधळाची झाल्याने सट्टा बाजारात संभ्रम कायम आहे. उमेदवारांच्या विजयावर भाव ठरविताना सट्टा व्यावसायिकांनाही घाम सुटला आहे.
अमरावती मतदारसंघ वगळता अन्य कोणत्याही मतदारसंघातील विजयी उमेदवार कोण? हे ठरविताना सट्टा व्यावसायिकांची गणिते बिघडली आहेत. मतदान प्रक्रिया आटोपून दोन दिवस झाले असताना विजयी उमेदवारांचे भाव निश्चित होत नसल्याची माहिती हाती आली आहे. अमरावतीत काँग्रेसचे रावसाहेब शेखावत आणि भाजपचे सुनील देशमुख यांच्यात थेट लढत आहेत. त्यानुसार सट्टा बाजारात पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर कोण? राहील याविषयी सट्टा लावला जात आहे. सट्टा बाजारात सुनील देशमुख यांना बाजूने झुकतेमाप देत असले तरी मुस्लिम वस्त्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये रावसाहेब शेखावतांना मिळालेला प्रतिसाद बघता सट्टा व्यावसायिकही संभ्रमात आहेत. त्यामुळे अमरावतीत धक्कादायक निकाल लागण्याचे संकेत आहेत. दर्यापूर, मोर्शी, अचलपूर, धामणगाव, मेळघाट, बडनेरा, तिवसा या मतदार संघात दुहेरी, तिहेरी लढत असल्याने सट्टा बाजारात स्थिर भाव ठरत नसल्याचे चित्र आहे. गुरुवारी उुशरा रात्री काही मतदारसंघांत होणाऱ्या लढतीतील उमेदवारांचे सट्टाबाजारात भाव निश्चित झाल्याची माहिती आहे. यात दर्यापूर, बडनेरा, तिवसा, धामणगाव, अचलपूर, मेळघाट व मोर्शी या मतदारसंघांचा समावेश होता.
युती, आघाडीतील घरोबा संपुष्टात आल्यामुळे सर्वच पक्षांची उमेदवार ठरविताना दमछाक झाली. काही पक्षांना वेळेवर उमेदवार निश्चित करावे लागले. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात होते. निवडणुकीच्या प्रचाराला कालावधी कमी मिळाल्याने उमेदवारही मतदारापर्यत पोहोचू शकले नाहीत. परिणामी काय निकाल लागेल, उमेदवारही संभ्रमात आहेत. त्यामुळे सट्टा बाजारात भाव ठरविताना व्यावसायिक मागे पुढे बघत आहे.

Web Title: Speculative market confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.