बेलोरा विमानतळाला येणार गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:12 PM2019-07-03T23:12:02+5:302019-07-03T23:12:15+5:30
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेलोरा विमानतळाच्या कामाला आता गती मिळाणार आहे. खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री हरदिपसिंग पुरी यांची भेट घेऊन या मागण्यांवर चर्चा केली. यावर मंत्र्यांनी प्रस्ताव मागितल्याचे खासदार राणा म्हणाल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेलोरा विमानतळाच्या कामाला आता गती मिळाणार आहे. खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री हरदिपसिंग पुरी यांची भेट घेऊन या मागण्यांवर चर्चा केली. यावर मंत्र्यांनी प्रस्ताव मागितल्याचे खासदार राणा म्हणाल्या.
बेलोरा विमानतळाचे काम अत्यंत संथ गतीने होत असल्याबाबत खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय उड्डाणमंत्र्यांचे लक्ष वेधले. या कामाची गतीवाढ करण्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली. विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबई, दिल्ली, सुरत व तिरुपती आदी ठिकाणी विमान उड्डाणसेवा सुरू करण्याची मागणी केली. यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री पुरी यांनी दिले.