शिधापत्रिका आधार जोडणीला गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:25 AM2018-04-10T00:25:34+5:302018-04-10T00:25:34+5:30

शिधापत्रिकाधारकांच्या आधारकार्ड जोडणीच्या कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत पुरवठा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष माहिती घेऊन त्या दूर कराव्यात. कुणीही गरजू व्यक्ती लाभापासून वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिलेत.

Speed ​​up the ration card support connection | शिधापत्रिका आधार जोडणीला गती द्या

शिधापत्रिका आधार जोडणीला गती द्या

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : जिल्हास्तरीय दक्षता समितीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिधापत्रिकाधारकांच्या आधारकार्ड जोडणीच्या कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत पुरवठा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष माहिती घेऊन त्या दूर कराव्यात. कुणीही गरजू व्यक्ती लाभापासून वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिलेत.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे एस.एच.पतंगे, अशासकीय सदस्य गंगा खारकर, प्रभा आकरे, विनोद तानवैस, शिरिष मढावी, पवनकुमार वसू आदी उपस्थित होते.
गरजू व्यक्ती स्वस्त धान्यापासून वंचित राहू नये. सर्व गावांमध्ये देखरेख समित्यांची स्थापना व्हावी, या उद्देशाने प्रयत्न करावेत. या कामाची यादी सादर करावी. समित्यांच्या बैठका नियमित व्हाव्यात. तूरडाळ वाटपाचे परिमाण मागणी तेवढा पुरवठा असे निश्चित केले आहे. गॅस स्टॅम्पिंगची प्रक्रिया पूर्ण करावी. उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस जोडण्यांची वितरकनिहाय आकडेवारी सादर करावी. आवश्यक तेथे गोदामाची दुरुस्ती करुन घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी केल्यात.

Web Title: Speed ​​up the ration card support connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.