जगातील स्पायडर संशोधकांनी संशोधनासाठी एकत्र यावे

By admin | Published: November 19, 2015 12:48 AM2015-11-19T00:48:11+5:302015-11-19T00:48:11+5:30

जगात स्पायडर (कोळी) वर खूप संशोधन झाले असून अजून बरेच संशोधन बाकी आहे

Spider researchers in the world should come together for research | जगातील स्पायडर संशोधकांनी संशोधनासाठी एकत्र यावे

जगातील स्पायडर संशोधकांनी संशोधनासाठी एकत्र यावे

Next

जोसेफ के.एच. कोह : दिलखुलास चर्चेतून दिली माहिती
अमरावती : जगात स्पायडर (कोळी) वर खूप संशोधन झाले असून अजून बरेच संशोधन बाकी आहे. जगात विखुरलेल्या स्पायडरच्या संशोधकांनी एकत्र येऊन संशोधन करावे, असे प्रतिपादन एशियन सोसायटी अ‍ॅरेकोनोलॉजीचे नवनियुक्त अध्यक्ष जोसेफ के.एच. कोह (सिंगापूर) यांनी केले. ते खास ‘लोकमत’ ला मुलाखत देताना बोलत होते.
हाय कमिशन सिंगापूर व आॅस्ट्रेलिया मधून सेवानिवृत्त झाल्यानंतर जोसेफ स्पायडरवर संशोधन करीत आहेत. ते पुढे म्हणाले, मला भारतात येऊन खूप आनंद झाला. येथे संस्कार व संस्कृती जपणारे लोक आहेत. ही तिसरी एशियन स्पायडर परिषद स्पायडरच्या नव्या अभ्यासकांना वरदान ठरली आहे.
विद्यार्थ्यांना एकाचवेळी जगातील एवढ्या संशोधकांना भेटता आले. त्यांच्याशी संवाद साधता आला. आपले संशोधन आपल्या पुरतेच सिमित न ठेवता ते सर्व अभ्यासकांपुढे मांडता आले. यामुळे नवीन पिढीसाठी त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग झाला पाहिजे, असेही ते म्हणाले. भारतात अतिथींचा आदर सन्मान करण्यात येतो. अमरावती शहर मला आवडले असून जे.डी. सांगळूदकर महाविद्यालयाने ग्रामीणमधून ही परिषद आयोजित केली.
त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्य संयोगिता देशमुख व स्पायडर संशोधक अतुल बोडखे यांचे विशेष कौतुक केले. यावेळी प्राचार्य संयोगिता देशमुख, डॉ. पारस्कर, अतुल बोडखे उपस्थित होते.
ही आंतरराष्ट्रीय स्पायडर परिषद अनेक संशोधकांसाठी मोठी उपलब्धी ठरणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना आवर्जून सांगितले. शहराचे कौतुक करताना येथील आतिथ्याचे कौतुक केले.

आंतरराष्ट्रीय परिषदेत जोसेफ यांची निवड

अमरावती येथे आयोजित तिसरी आंतरराष्ट्रीय परिषदेत एशियन सोसायटी आॅफ अ‍ॅरेकोनोलॉजीच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी सिंगापूर येथील संशोधक जोसेफ के.एच. कोह यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष ओनो यांनी त्यांची सूत्रे जोसेफ यांच्या हाती दिली.

Web Title: Spider researchers in the world should come together for research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.