जिल्हाभरात विदर्भवाद्यांचे आत्मक्लेष आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 09:55 PM2018-10-02T21:55:22+5:302018-10-02T21:55:50+5:30
विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे २ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर एकदिवसीय आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. २०१९ पूर्वी विदर्भ दिला नाही, तर निवडणुका जड जातील, असा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे २ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर एकदिवसीय आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. २०१९ पूर्वी विदर्भ दिला नाही, तर निवडणुका जड जातील, असा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना देण्यात आला.
आंदोलनाच्या माध्यमातून वेगळा विदर्भ राज्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. राजेंद्र आगरकर, रंजना मामर्डे, रियाज अहमद, सतीश प्रेमलवार, नागेश डोरलीकर, विजय कुबडे, लक्ष्मण वानखडे, किशोर मसराम, मोहन बुंदेले, मच्छिंद्र राऊत, साहेबराव इंगळे, संजय हिंगे, विश्वास इंगळे, गुणवंत वाहने, भीमराव नाईक, आरती गुप्ता, विजय मोहोड, फय्याज अली, माधवराव गावंडे, सतीश इंगळे, नवल जाजू, प्रमोद तायडे, सुनील राऊत, विजय श्रीवास्तव आदी सहभागी झाले.
चांदूरबाजार येथे आंदोलन
चांदूर बाजार : विदर्भ राज्य समितीच्यावतीने चांदूर बाजार येथे जुन्या पंचायत समितीपुढे आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. अचलपूर, मेळघाट विभागाचे प्रमुख बंटी केजडीवाल यांच्या नेतृत्वात मनोज वासनकर, ज्ञानेश्वर गंदे, बाळासाहेब भेटाळू, दिगंबर चुनोडे, विनायक इंगोले, अभिजित शेरेकर, उमोश कोंडे, सुनील देशमुख, संतोष कोठाडे, बाळासाहेब किटुकले, सुनील चौधरी, राजेंद्र पारिसे, मनोज वासनकर, प्रशांत मस्के यावेळी उपस्थित होते.
वरूड येथे विदर्भाची मागणी बुलंद
वरूड : येथील महात्मा फुले चौकात शेतकरी नेते दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात शेकडो विदर्भवाद्यांनी आंदोलन करून स्वतंत्र विदर्भाची मागणी केली. यावेळी सुधाकर गायकी, प्रमोद चौधरी, रघुनाथ खुजे, अशोक वानखडे, शिवहरी सावरकर, रमेश जिवनकर, विजय फरकाडे, अनिल वानखडे, पुंडलिक लोहकरे, प्रकाश ठाकरे, दिलीप लव्हाळे, बाबाराव माकोडे, माजी नगराध्यक्ष जया नेरकर, मीना बंदे, माया यावलकर, तारा बारस्कर, रंजना मालपे, मधुमती विखार, सोनल चौधरी, वैशाली मोरस्कर, अरुणा बेहरे, प्रिया चव्हाण, अश्विनी आजनकर, नम्रता धाडसे, मंगला कुकडे, देवेंद्र गोरडे, वासुदेव खासबागे, सुभाष भोंगाडे, अशोक श्रीवास यांच्यासह सत्यशोधक फाउंडेशन, महिला विकास मंच, श्रद्धा शिक्षण संस्था, चुडामणी नदी मित्र परिवार, वरूड व्यापारी संघ, संकल्प युवा मित्र मंडळाचे पदाधिकारी, नागरिक सहभागी झाले होते.