धान्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 10:49 PM2018-05-13T22:49:16+5:302018-05-13T22:49:16+5:30
कृषी समृध्दी उत्पादक कंपनी लि. अचलपूर व शेतकरी मित्र कृषी पदवीधर बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित धान्य महोत्सवाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कृषी समृध्दी उत्पादक कंपनी लि. अचलपूर व शेतकरी मित्र कृषी पदवीधर बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित धान्य महोत्सवाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. हा महोत्सव ९ ते १४ मे पर्यंत आयोजित करण्यात आला होता. पण, शेतकरी व नागरिकांच्या आग्रहास्तव, १६ मे पर्यंत हा महोत्सव न्यायालय मार्गावरील शाश्वत कन्सेप्ट स्कूलमध्ये राहणार आहे.
या महोत्सवात राज्यातील १८ शेतकरी गट सहभागी झाले असून, यामध्ये लातूर, उस्मानाबाद, परभणी या ठिकाणी येथील शाडूची रबी गुळचट ज्वारी, भंडारा, गोंदिया, महोदा येथील शेतकºयांचा तांदूळ विक्रीसाठी आणण्यात आला आहे.तसेच रत्नागिरी येथून हापूस आंबा या ठिकाणी आणला आहे. खारपाणपट्यातील खास, तुरडाळ, मूग, उडीद डाळ, चणा डाळ काबूली हरभरा विक्रीसाठी उपलब्ध आहे. शेंद्रीय हळद, विषमुक्त धान्य येथील आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ठेवण्यात आले आहे. नाशिकचा काळा मनुका स्टॉलवर विक्रीस ठेवण्यात आला आहे. प्लॅस्टिक बंदीमुळे येथे साडीपासून पिशवी शिवण्यासाठी दोन बचतगट या ठिकाणी उपलब्ध आहे.
दोन दिवस सुरू राहणार महोत्सव
महोत्सवाला वाढता पतिसाद लक्षात घेता आणखीन दोन दिवस महोत्सवाचा कालावधी वाढविण्यात आला असून १६ मे पर्यंत हा धान्य महोत्सव सुरू राहणार असल्याची सामाजिक कार्यकर्ते रवि पाटील यांनी सांगितले.