‘हाफ मॅराथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 01:08 AM2018-10-22T01:08:57+5:302018-10-22T01:09:24+5:30
येथील मॅराथॉन असोसिएशनच्यावतीने रविवारी तिसऱ्या हॉफ मॅराथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २१, १० आणि ५ कि.मी. अशा प्रकारे तीन गटाच्या वर्गवारीत ही स्पर्धा घेण्यात आली आली. यात लहान मुलांचा मोठा सहभाग होता. या स्पर्धेत राज्यासह बेंगळुरू, हैदराबाद येथील धावकांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील मॅराथॉन असोसिएशनच्यावतीने रविवारी तिसऱ्या हॉफ मॅराथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २१, १० आणि ५ कि.मी. अशा प्रकारे तीन गटाच्या वर्गवारीत ही स्पर्धा घेण्यात आली आली. यात लहान मुलांचा मोठा सहभाग होता. या स्पर्धेत राज्यासह बेंगळुरू, हैदराबाद येथील धावकांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आणि जाणता राजा वेलफेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हॉफ मॅराथॉन स्पर्धेला आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते झेंडी दाखवून प्रारंभ झाला. यावेळी क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, प्राचार्य देवनाथ, विजय ठाकरे, उत्तमसिंग ठाकूर आदी उपस्थित होते. येथील विभागीय क्रीडा संकुलातून प्रारंभ झालेल्या या स्पर्धेत १३५० धावकांनी सहभाग नोंदविला. पहिल्यांदा लहान मुलांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविल्यामुळे आयोजकांना काही स्पर्धक मुलांना परत करावे लागले. आॅनलाईन आणि प्रत्यक्ष १४८० स्पर्धकांनी नोंदणी केली असली तरी १,३५० स्पर्धक धावले. टाटा ट्रस्ट, प्रशासकीय अधिकारी व कर्मचाºयांनीदेखील या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेचे बक्षीस वितरण खासदार आनंदराव अडसूळ, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते संजय खोडके, माजी आमदार प्रदीप वडनेरे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील खराटे, अनिल लाहोटी, हरीश देशपांडे, सोमेश्र्वर पुसतकर, दिलीप पाटील आदींच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सुभाष गावंडे, अतुल पाटील, मुकुंद वानखडे, किशोर वाठ, सतीश दवंडे, हनुमान गुजर, श्रीनिवास उदापुरे, गजानन धर्माळे, नरेंद्र पंचारीया, वासुदेव रोंघे, सुनील जांगडे, ममेश माथनकर, मनीष जामनेरकर आदींनी परिश्रम केले. स्पर्धेदरम्यान पोलीस बंदोबस्त फारसा दिसून आला नाही, हे विशेष.
या स्पर्धकांनी पटकाविले रोख बक्षीस
हॉफ मॅराथॉनच्या २१ किमी. लांबीच्या स्पर्धेत पुरूष गटातून ४५ वर्ष वयोगटाच्याआतील प्रल्हाद धनावत, अजित भेंडे, अक्षय मोहिते, विनोद सिरसाट, देवा राणे, तर ४५ वर्षे वयोगटाच्यावरील पांडुरंग पाटील, कैलास माने, नागोराव भोयर, घनशाम पदमगिरवार, लक्ष्मण शिंदे यांनी रोख बक्षीसे मिळवली आहे. तसेच महिला गटातून ४० वर्षाच्या आतील ज्योती गवते, पूनम अंकुरकर, रोशनी खोब्रागडे, अनुराधा मोर्य, प्रिती ठाकूर तर ४० वर्षे वयोगटाच्यावरील शोभा देसाई, शारदा भोयर, जयश्री, कामठेवाड, राखी मनियार, श्रृती नानवाणी, राज्याबाहेरील स्पर्धकांमध्ये पुरूषांमध्ये विष्णू राठौर, रणजित सिंह, जगदीश पटेल, तर महिलांमधून सविता श्रृती, बुला मोंडाल यांचा समावेश आहे.
१० कि.मी. पॉवर रन गटात पुरूषात हरमज्योत सिंह, किरण मत्रे, अर्जून साळवे तर, महिलांमधून शीतल बारई, यामिनी ठाकरे, नंदीनी पवार यांनी बक्षिसे पटकाविले. तसेच ५ कि.मी. लांबीच्या स्पर्धेत मुलांमधून पवन चव्हाण, सचिन पटेल, कुणाल ब्राम्हणकर तसेच मुलींमधून अश्विनी जाधव, तन्वी खोरणे, अश्विनी अहेरवार यांनी बक्षीसे पटकाविली. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ४ लाख ४० हजार रूपयांची बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.