बडनेऱ्यात कठोर संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:13 AM2021-05-14T04:13:19+5:302021-05-14T04:13:19+5:30
बडनेरा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ९ मे पासून कठोर संचारबंदी सुरू झाली. बडनेरातील महापालिकेचे पथक रस्त्यांवर फिरून नागरिकांना विनाकारण ...
बडनेरा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ९ मे पासून कठोर संचारबंदी सुरू झाली. बडनेरातील महापालिकेचे पथक रस्त्यांवर फिरून नागरिकांना विनाकारण बाहेर पडू नका, असे आवाहन करीत आहे. पोलिसांची गस्तदेखील वाढविली आहे.
कठोर संचारबंदीत शहरवासीयांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा आकडा कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर संचारबंदी लागू केली आहे. याला शहरवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोन, चार प्रतिष्ठाने, दुकाने वगळल्यास कडकडीत बंद आहे. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांची काहीसी गर्दी आहे. त्यांना महापालिका पथकाकडून तसेच बडनेरा पोलिसांकडून घरीच थांबण्याचे आव्हान केले जात आहे. कारवाईदेखील केली जात आहे. एकूणच बडनेरा शहराने कठोर संचारबंदीला चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी, महापालिका सहाय्यक आयुक्त विशाखा मोटघरे, स्वास्थ्य निरीक्षक, इतर कर्मचारी या कर्तव्यात सातत्याने परिश्रम घेत आहे.
०००००००००००००००