अमरावतीचे वैभव छायाचित्रातून टिपले, महानगरपालिका, विधिमंत्र फोटोवॉकला उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 06:16 PM2023-02-05T18:16:39+5:302023-02-05T18:38:36+5:30
गणेश वासनिक अमरावती - अमरावतीच्या विधिमंत्र छायाचित्रण प्रतिष्ठान व अमरावती महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 'स्ट्रीट फोटोवॉक' या अभिनव ...
गणेश वासनिक
अमरावती - अमरावतीच्या विधिमंत्र छायाचित्रण प्रतिष्ठान व अमरावती महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 'स्ट्रीट फोटोवॉक' या अभिनव उपक्रमाला अमरावतीतील छायाचित्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन छायाचित्रणाचा आनंद लुटला.
या स्ट्रीट फोटोवॉकची सुरुवात जवाहर द्वार येथून झाली. जवाहर द्वार व परकोटाच्या पुरातन बांधकामाचे आणि समोरील फुल विक्रेत्यांचे छायाचित्रण केल्यानंतर सर्व छायाचित्रकार ईतवारीतील भाजी बाजाराकडे वळले. तिथे त्यांनी भाजी विक्रेते, फळ विक्रेते व खरेदी साठी आलेल्या अनेकविध ग्राहकांचे छायाचित्रण केले. महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमाला महानगरपालिकेच्या झोन क्र. १ चे साहाय्यक आयुक्त व जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर आणि झोन क्र. ५ चे साहाय्यक आयुक्त तौसिफ काझी हे उपस्थित होते.
या उपक्रमात अस्तिरोग तज्ञ व छायाचित्रकार डॉ. चंद्रशेखर कुळकर्णी, वृत्तपत्रकार सर्वेश मराठे, अशोकजोशी, सुप्रिया पुसतकर, इतर छायाचित्रकार व श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या जनसंपर्क विभाग व छायाचित्रण विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमास भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल विधिमंत्र छायाचित्रण प्रतिष्ठानचे संचालक देवव्रत कुळकर्णी यांनी आभार मानले आहेत.