क्रीडा संकुलाचे प्रवेशद्वार प्रेमीयुगुलांचा अड्डा !

By admin | Published: February 13, 2017 12:03 AM2017-02-13T00:03:03+5:302017-02-13T00:03:03+5:30

विभागीय क्रीडा संकुलाचे प्रवेशव्दार प्रेमीयुगुलांचा अड्डा बनले आहे. तासन्तास तोंडाला रुमाल बांधून उभे दुचाकींवर बसून गप्पा मारणाऱ्या तरूण-तरूणी, ....

Sports complex entrance lover! | क्रीडा संकुलाचे प्रवेशद्वार प्रेमीयुगुलांचा अड्डा !

क्रीडा संकुलाचे प्रवेशद्वार प्रेमीयुगुलांचा अड्डा !

Next

आक्षेपार्ह चाळे : क्रीडा उपसंचालक, पोलिसांचे दुर्लक्ष
संदीप मानकर अमरावती
विभागीय क्रीडा संकुलाचे प्रवेशव्दार प्रेमीयुगुलांचा अड्डा बनले आहे. तासन्तास तोंडाला रुमाल बांधून उभे दुचाकींवर बसून गप्पा मारणाऱ्या तरूण-तरूणी, खुलेआम अश्लील चाळे करणारे अल्पवयीन जोडपे येथे दररोज आढळत असतानाही याकडे क्रीडा उपसंचालकांचे दुर्लक्ष होत असल्याने सार्वजनिक ठिकाणी चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलांवर पोलीस कारवाई करणार का, असा प्रश्न सभ्य नागरिकांना पडला आहे.
येथील क्रीडा संकुलाचे उजव्या बाजुचे प्रवेशव्दार रात्री बंद असते व येथे आंधार असतो. त्यामुळे शहरातील प्रेमीयुगुल अंधाराचा फायदा घेऊन सायंकाळी ७ वाजतापासून रात्री उशिरापर्यंत याठिकाणी तोंडाला रूमाल बांधून तासन्तास उभे राहतात. काही प्रेमीयुगुल तर दुचाकी आडोशाला लाऊन अनेकदा अश्लिल चाळे करताना दिसतात. त्यामुळे सभ्य नागरिकांना येथून खाली मान घालूनच जावे लागते. काही महिन्यांपूर्वी हा प्रकार ‘लोकमत’ने लोकदरबारात मांडून येथील प्रेमीयुगुलांचा वावर बंद केला होता. विभागीय क्रीडासंकुलाच्यावतीने याठिकाणी हॅलोेजन लाईट लावले होते. तो दरवाजा रात्री नागरिकांसाठी खुला केला होता. याठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते.
गाडगेनगर पोलिसांनीही पेट्रोलिंग करुन प्रेमीयुगुलांवर आळा घातला होता. त्यामुळे काही महिने येथील वातावरण सुधारले होते. परंतु आता परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे. क्रीडासंकुलच्यावतीने हा दरवाजा रात्रीच्या वेळीस बंद ठेवण्यात येतो. येथील प्रवेशव्दाराजवळील दिवेही बंद असतात. त्यामुळे प्रेमीयुगुलांनी पुन्हा येथे आपला अड्डा तयार केला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लिल चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. सभ्य नागरिकांना दिलासा देण्याकरिता हे पाऊल उचलणे गरजेचे आहे.

पोलिसांची मिलीभगत
क्रीडा संकुलाचे प्रवेशद्वार आणि परिसरातील गाळ्यांसमोर झुंडीने तरुण तरुणी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारतात. हा परिसर त्यांच्या चोरभेटीचे आवडते ठिकाण झाले आहे. उर्मट आणि उद्धट वागणारे अनेक टारगट तरुण तेथे ठिय्या मांडून असतात. पॅसिव्ह स्मोकिंग, डिस्पोजेबल ग्लासेसच्या मदतीने दारु पार्टी, मुलींशी अश्लिल चाळे, हुल्लडबाजी असले प्रकार रोज सर्रास चालतात. परिसरातील गाळ्यांसमोर आणि रस्त्यावर वाहने पार्क करुन मुलगा किंवा मुलगी कुणा एकाच्या बाईकवर निघून जातात. तरुणांची ही गर्दी बघून परिसरात निवांत उपलब्ध करुन देणारे चार कॉफी आणि आईसक्रीम पार्लर भूछत्र उगवावे तसे सुरू झाले. सर्वच पार्लर हाऊसफुल्ल असतात. आश्चर्य असे की जोडप्यांचा त्रास होत असल्याची तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्यात परिसरातील कार्यालयांतून फोनद्वारे करण्यात आल्यावर पोलीस येतात, यारबाजीच्या गोष्टी होतात आणि गुडफेथमध्ये तात्पुरते त्या तरुणांना जायला सांगितले जाते. नंतर हे पोलीस तक्रारकर्त्यांच्या फोनवर संपर्क साधून रागावण्याचा खोटा-खोटाच आवाज काढतात आणि साहेब, आम्ही त्यांना भगवले, असे सांगतात. पोलिसांची या अड्ड्यात मिलिभगत असल्याचेच त्यातून स्पष्ट होते.

Web Title: Sports complex entrance lover!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.