क्रीडा, कला कौशल्यातून निपुण बनविण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:09 PM2019-02-14T23:09:57+5:302019-02-14T23:10:15+5:30

जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांच्या स्वागतगीतावरील नृत्यासह अप्रतिम सांस्कृतिक प्रदर्शनाने माझे मन गहिवरून आले. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना शिक्षणासह क्रीडा व कला कौशल्यातही निपूण बनविण्याचे काम झेडपीचे शिक्षक उत्तमरीत्या करीत असल्याचे प्रतिपादन आ.यशोमती ठाकूर यांनी येथे केले.

Sports, skill making, skill making | क्रीडा, कला कौशल्यातून निपुण बनविण्याचे काम

क्रीडा, कला कौशल्यातून निपुण बनविण्याचे काम

googlenewsNext
ठळक मुद्देयशोमती ठाकूर : जिल्हा परिषदेचे क्रीडा महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांच्या स्वागतगीतावरील नृत्यासह अप्रतिम सांस्कृतिक प्रदर्शनाने माझे मन गहिवरून आले. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना शिक्षणासह क्रीडा व कला कौशल्यातही निपूण बनविण्याचे काम झेडपीचे शिक्षक उत्तमरीत्या करीत असल्याचे प्रतिपादन आ.यशोमती ठाकूर यांनी येथे केले.
शिराळा येथील कस्तुराबाई विद्यालय, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवाचे गुरुवारी उद्घाटन झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाणे, प्रमुख अतिथी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, शिक्षण व बांधकाम सभापती जयंत देशमुख, वित्त व आरोग्य समिती सभापती बळवंत वानखडे, समाजकल्याण सभापती सुशीला कुकडे, सीईओ मनीषा खत्री, राज्य शिक्षण समितीचे अध्यक्ष मनोज देशमुख, पं.स. सभापती वहीदाबी इसूफ शहा, शिक्षण समिती सदस्य अलका देशमुख, श्याम मसराम, अनिल डबरासे, राजेंद्र बहुरूपी, पं.स.सदस्य संगीता तायडे, अजय भुयार, गणेश कडू, वीरेंद्र लंगडे, शिराळाचे सरपंच सचिन देशमुख, उपसरपंच तेजस्विनी आमले, जाधव, सचिन पाटील, रमेश खातदेव, सुनील कडू, प्रमोद गावंडे, जियाभाई, मुकुंद देशमुख, गजानन झाकर्डे, लोकेश केणे उपस्थित होते.
यावेळी मुलींचे लेझीम पथक, चिमुकल्यांनी केलेली अश्वावरील जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा उपस्थितांचे लक्षवेधक ठरली.

Web Title: Sports, skill making, skill making

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.