कृषिदिनी शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:09 AM2021-07-04T04:09:12+5:302021-07-04T04:09:12+5:30
चिखलदरा : वसंतराव नाईक यांच्या जयंतीला कृषिदिनानिमित्त तालुक्यातील प्रयोगशील व होतकरू आदिवासी शेतकऱ्यांचा सत्कार बोराळा येथे गुरुवारी करण्यात ...
चिखलदरा : वसंतराव नाईक यांच्या जयंतीला कृषिदिनानिमित्त तालुक्यातील प्रयोगशील व होतकरू आदिवासी शेतकऱ्यांचा सत्कार
बोराळा येथे गुरुवारी करण्यात आला.
बोराळा येथील गणाजी जांबू यांनी प्रारंभी गिट्टी खदानमध्ये काम केले. यानंतर त्यांनी शेतीत वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीकडे लक्ष दिले. परिणामी उत्पन्न वाढले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत मुलांना शिक्षण दिले. आता एक सैन्यात आहे, तर दुसरा मुलगा जिल्हा परिषदेत शाळेत शिक्षक आहे. त्यांच्या बागेत आंबा, संत्राबाग असून गाई, म्हशीदेखील पाळल्या आहेत. सेंद्रिय खतांचा वापर करीत ते शेती करतात. कृषिदिनाच्या सोहळ्यात गहू पिकाच्या विक्रमी उत्पादनासाठी आदिवासी आणि इतर शेतकऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यात शेतकरी गणाजी मानाजी जांबू यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व संचालन कृषी अधिकारी राम देशमुख यांनी केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दयाराम काळे, पंचायत समिती सभापती बन्सी जामकर, सरपंच संजय भास्करे, कृषी अधिकारी शालिनी वानखडे, विस्तार अधिकारी बंडू घुगे, सामाजिक कार्यकर्ते मानिराम चिलाटी, सचिव सुहास कोठेकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी व्ही.डी. कपले, कृषिसेवक दारसिंबे व परिसरातील शेतकरी हजर होते.
030721\img-20210702-wa0015.jpg
आदिवासी शेतकर्यचा सन्मान