लोणीमध्ये फवारणी, गाव लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:14 AM2021-05-09T04:14:04+5:302021-05-09T04:14:04+5:30
वरूड / लोणी : वरूड तालुक्यातील लोणी गावात कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक असल्याने ते हॉटस्पॉट ठरले आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने ...
वरूड / लोणी : वरूड तालुक्यातील लोणी गावात कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक असल्याने ते हॉटस्पॉट ठरले आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने गाव सील केले. दरम्यान ग्राम पंचायतीने बाहेरून येणाऱ्या लोकांना गावबंदी करून गावात सॅनिटायझेशन तसेच फवारणी करून कोरोनावर नियंत्रण मिळविणे सुरू केले आहे.
लोणी गावात केवळ अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा, प्रतिष्ठाने बंद ठेवून गावात शंभर टक्के लॉकडाऊन जाहीर केला. विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांवर बंदी व दंडात्मक कारवाई सुरू आहे. यासाठी सरपंच अश्विनी दवंडे, उपसरपंच रविकांत तिखे, ग्राम विकास अधिकरी धोटे, सदस्य अविनाश सोनारे, ताराचंद फुटाणे, दिनेश गुल्हाने, प्रकाश सनेसर, आकाश पापडकर, चेतन खोडस्कर, धीरज अंबाडकर, कोरोना नियंत्रण समितीचे अश्विन दवंडे, माजी सरपंच नितीन टेम्भे, सुरेंद्र ठाकरे , आदी पदाधिकारी, अधिकारी यांनी परिश्रम घेऊन कोरोनाग्रस्ताच्या संख्येत घट केली.