नामकरण सोहळ्याला गावात सॅनिटाराईजरची फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:13 AM2021-05-16T04:13:20+5:302021-05-16T04:13:20+5:30
धामणगाव रेल्वे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातही उपाययोजना केल्या जात आहेत. निंभोरा बोडखा येथील दिनेश पाचबुद्धे ...
धामणगाव रेल्वे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातही उपाययोजना केल्या जात आहेत. निंभोरा बोडखा येथील दिनेश पाचबुद्धे यांनी आपल्या मुलाचा नामकरण सोहळा न करता,या नामकरण सोहळ्याच्या रकमेतून गावातील वाड्या-वस्तीवर जाऊन मास्कचे वाटप करुन कोरोना संदर्भात माहिती दिली. तसेच गावात ब्लोअरच्या सहाय्याने निर्जंतुकीकरणासाठी सोडियम क्लोराइडची फवारणी केली. गावातील मुख्य रस्ते, वसाहती व वाडी वस्त्यांवर निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी करुन कोरोना संदर्भात जनजागृती केली व मोफत मास्कचे वाटप केले. यावेळी दिनेश पाचबुद्धे, पोलिस पाटील विशाल बांते,अश्विनी चवरे,सचिन बमनोटे, गजानन चवरे,प्रवीण बांते,अश्विन चौधरी, महेश पाचबुद्धे, रोशन मते,गोलू सोरटकर, रोशन पांडे, सागर तुमसरे,निखिल घिये, अभिजित कोरडे, कुणाल गवारले, आकाश झेले, राहुल अलोणे, कार्तिक मते, रिंकेश लुटे व आदी उपस्थित होते. हा उपक्रम आदर्श व प्रेरणादायी असलल्याचे मत सरपंच कांचन झेले (चवरे) यांनी व्यक्त केले.