अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:12 AM2021-05-14T04:12:31+5:302021-05-14T04:12:31+5:30

फोटो पी १३ पथक परतवाडा : अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ...

Squad action in rural areas of Achalpur taluka | अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात पथकाची कारवाई

अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात पथकाची कारवाई

Next

फोटो पी १३ पथक

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांसह विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी स्वारांविरुद्ध दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू आहे. तालुक्यातील सात मंडळात ४१ गावांना भेट देऊन १७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

अचलपूर तालुक्यातील परतवाडा, अचलपूर, रासेगाव, असदपूर, पथ्रोट, परसापूर असे एकूण सात मंडळांत भरारी पथक तयार करण्यात आले आहे. तहसीलदार मदन जाधव हे स्वतः परतवाडा मंडळात फिरत आहेत. नायब तहसीलदार शंकर श्रीराव, मंडळाधिकारी एन. एस. धोटे, तलाठी किरण गोंगे, राहुल खानंदे, आकाश नवले यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार या पथकाने मंगळवारपर्यंत ४१ पेक्षा अधिक गावांना भेटी दिल्या.

शेतीकामासाठी डिझेल

शेतकऱ्यांना शेती नांगरणे, पीक पेरणीसाठी शेती तयार करताना ट्रॅक्टरमध्ये आवश्यक असलेल्या डिझेलसाठी मुभा देण्यात आली. विनाकारण पेट्रोल पंपावर वारंवार येण्याचे टाळावे, असे आवाहन अचलपूर उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी केले आहे. नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

Web Title: Squad action in rural areas of Achalpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.